Tuesday, July 5, 2011

(१७४) किती पायी लागू तुझ्या............चोरीला गेलेल्या सायकलबद्दलचा विलाप



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



किती पायी लागू तुझ्या चोरीला गेलेल्या
सायकलबद्दलचा विलाप



किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तूंते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते

काय गा म्या पामराने
खरडावी बाराखडी
आणि बोलावी उत्तरे
टिनपट वा चोमडी

कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला !

कवी : बा. सी. मर्ढेकर


किती पायी चालू माझ्या
किती आठवू गा तूंते
किती शब्द बनवू गा
तव चिंतनाचे, जे मनी येते

काय गा म्या दुर्दैव्याने
करावी पायपिटी
अन्‌ वदावे - "सापडता चोर
तोडीन त्याची मी खास तंगडी”

सांग, परतशील का तू ,
हात लावुनी तुझ्या गळ्याला,
चुकवून डोळा त्या चोराचा;
येईल उजाळा माझ्या नशिबाला !


No comments:

Post a Comment