Monday, July 4, 2011

(१७३) रूपकळा...........................................रूपकळा



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



रूपकळा रूपकळा


प्रति एक झाडामाडा
त्याची त्याची रूपकळा
प्रति एक पाना फुला
त्याचा त्याचा तोंडवळा

असो पाखरु मासोळी
जीव जिवार मुंगळी
प्रत्येकाची तेवठेव
काही आगळी वेगळी

असो ढग असो नग
त्याची अद्भुत रेखणी
जी जी उगवे चांदणी
तिच्या परिने देखणी

उठे फुटे जी जी लाट
तिचा अपूर्वच घाट
फुटे मिटे जी जी वाट
तिचा अद्वितीय घाट

भेटे जे जे त्यात भरे
अशी लावण्याची जत्रा
भाग्य केवढे, आपुली
चाले यातुनच यात्रा

कवी : बा. भ. बोरकर

प्रति एक माणसा-माणसा
त्याची त्याची रूपकळा
प्रति एक स्त्री-पुरुषा
तिचा त्याचा तोंडवळा

कुणी डॉक्टर, कुणी चांभार
कुणी गवळी, कुणी कोळी
प्रत्येकाची तेवठेव
काही आगळी वेगळी

असे कुणी ढ, असे कुणी नग,
अद्भुत सर्वांची करणी.
असे कुणी चटकचांदणी
तिच्या परीने देखणी

ज्याचा त्याचा ललाटलेख
कुणाचा सुरेख, कुणाचा मळकट
ज्याची त्याची वेगळी वाट
तिचा अद्वितीय घाट

वाटाचालीं जो तो असे पाहत
मानवी आयुष्याची जत्रा
कुणी सुखाने, कुणी दुःखाने
करतसे आपली जीवनयात्रा


No comments:

Post a Comment