Monday, July 4, 2011

(१७२) मला टोचते मातीचे यश.....................कवीची दुरवस्था



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



मला टोचते मातीचे यश कवीची दुरवस्था



श्रावणातले ऊन रेशमी
आकाशाला बांधून ठेवी
घट्ट धरेशी
सह्याद्रीच्या गळ्यात पडती
श्रावणतल्या सरी सराईत
ओलेत्याने
आणि ओणव्या माळालाही
हंबरणारा अवखळ वारा
ढुशी मारतो भलत्या जागी
अडचणीतल्या पाऊलवाटा
अंग चोरुनी हळूच पळती
माझ्या जवळून
मजला टाळून
- ब्रम्ह जाहले धरणीला वश
अशा प्रसंगी
आत कुठेसे
मला टोचते मातीचे यश

कवी : विंदा करंदीकर


काव्योर्मी माझी ऊन रेशमी
आकाशाला गवसणी घाली
घट्ट धरूनी.
वाचकांच्या गळ्यात पडते
मत्काव्याचे लोढणे अवजड
दुर्दैवाने.
आणि "कैदी" श्रोतृगणाला
हंबरणारे मत्काव्यवाचन
ढुशी मारते भलत्या जागी.
चलाख, हुशार जनता परंतू
अंग चोरुनी हळूच पळते
सभागृहातून
मत्काव्य टाळून.
-ब्रम्ह होते त्या जनतेला वश.
अशा प्रसंगी
आत खूपसे
मला टोचते माझे अपयश!


No comments:

Post a Comment