Saturday, July 9, 2011

(१७८) कुणा काही देता देता............................कुणा काही सतावता



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



कुणा काही देता देता कुणा काही सतावता



कधी रिकाम्या हातात
भरली सुरई यावी
डोळे मिटून चालता
स्वप्नगुंफा गवसावी

शून्य शून्य नजरेला
क्षितीजाचा रंग यावा
पावसाच्या थेंबातून
रुपगंधी अर्थ यावा

कधी काही ओलांडता
पाया रुतावी हिरवळ
कुणा काही देता देता
पुन्हा भरावी ओंजळ

कवयित्री : वासंती मुझुमदार


कधी आपल्या हातात
धारेची सुरी घ्यावी
अन्‌ डोळे दोन्ही मिटून
ती आपण चालवावी!

किंवा आपल्या नजरेला
ढंग सुरीचा यावा
एका तीक्ष्ण कटाक्षातून
संदेश अर्थसंपृक्त द्यावा

कधी काही ओलांडता
पाया रुतावा काटा
तसे कुणी सतावता
काढावा काट्याने काटा!


No comments:

Post a Comment