खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
असेल जेव्हा फुलावयाचे | रुसवा आणि फुगवा |
---|---|
असेल जेव्हा फुलावयाचे तुझ्याचसाठी फूल सखे तू फूल सखे तू फुलण्यासाठी; फूल मनातिल विसरून हेतू. या हेतूला गंध उद्याचा; या हेतूची कीड मुळाला; फूल सखे तू फुलण्यासाठी; या हेतूचा चुकवून डोळा. फूल सखे होऊन फुलवेडी; त्या वेडातच विझव मला तू विझव नभाच्या आळवावरचे; स्थळ-कालाचे हळवे जंतू. कवी : विंदा करंदीकर |
असेल जेव्हा फुगावयाचे कश्याहीसाठी फूग सखे तू फूग सखे तू फुगण्यासाठी; फूग मनातिल विसरून हेतू. या हेतूला गंध उद्याचा; या हेतूची कीड मुळाला; फूग सखे तू फुगण्यासाठी; या हेतूचा चुकवून डोळा. फूग सखे होऊनी होडी; त्या होडीतच घालून मला तू पोचवी पैलतीरावरती स्थळ-कालाचा कशास किंतू? |
No comments:
Post a Comment