Saturday, July 9, 2011

(१८०) अंतरिक्ष फिरलो पण................................मंत्र्याचे मनोगत



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



अंतरिक्ष फिरलो पण मंत्र्याचे मनोगत



अंतरिक्ष फिरलो पण
गेली न उदासी
गेली न उदासी
लागले न हाताला
काही अविनाशी
काही अविनाशी

क्षितीज तुझ्या चरणांचे
दिसते रे दूर
दिसते रे दूर
घेऊनि मी चालु कसा
भरलेला ऊर
भरलेला ऊर

जरि वाटे जड कळले
तळ कळला नाही
तळ कळला नाही
जड म्हणते, " माझा तू "
क्षितीज म्हणे. " नाही"
क्षितीज म्हणे. " नाही"

अंतरिक्ष फिरलो पण
गेली न उदासी
गेली न उदासी

कवी : म. म. देशपांडे


जगभर फिरलो पण
गेली न मिजासी
गेली न मिजासी
लागली अन्‌ हाताला
बहुत सत्ता
अन्‌ मालमत्ता

क्षितीज ते सत्तेचे
दिसते मज दूर जरूर
हातातिल सत्तेने जरी मगरूर.
घेऊनि मी चालु राहतो
महत्त्वाकांक्षा उरी
आकाशापरी

जरि वाटे मर्म कळले
पूर्ण मर्म न अजून कळले
आकाश क्षितीजा न अजून भिडले
मर्म म्हणते “असे तुझे मी”
कर्म म्हणते “अजून नाही"
निरीक्षण म्हणते “अजून नाही"

जगभर फिरलो पण
गेली न मिजासी
आहे मी विलासी!



No comments:

Post a Comment