खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
वेड्याचे प्रेमगीत | कवीचे विनवणीगीत |
---|---|
येणार तर आत्ताच ये; येणार तर आत्ताच ये; उद्या तुझी जरूर काय? ... आज आहे सूर्यग्रहण; आज मला तुझा म्हण; उद्या तुझी जरूर काय? बेकारीच्या खुराकावर तुझी प्रीती माजेल ना? सूर्याच्या या तव्यावरती चंद्राची भाकर भाजेल ना? ... भितेस काय खुळे पोरी; पाच हात नवी दोरी काळ्या बाजारात उधार मिळेल. सात घटका सात पळे हा मुहूर्त साधेल काय? संस्कृतीचे घटिकापात्र दर्यामधे बुडेल काय? ... उद्याच्या त्या अर्भकाला आज तुझे रक्त पाज; ... भगवंताला सारी लाज. येणार तर आत्ताच ये; अंधाराच्या मांडीवरती जगतील सात, मरतील सात; आकाश आपल्या डोक्यावर पुन:पुन्हा मारील हात. ... भरल्या दु:खात रडू नये; येणार तर आत्ताच ये; येणार तर आत्ताच ये; उद्या तुझी जरूर काय? कवी : विंदा करंदीकर |
आत्ताच वाच, आत्ताच वाच, माझी ही कविता आत्ताच वाच; उद्या रचीन नवी कविता अन् ह्या कवितेचा संपेल जाच. आज मला कवी म्हण; उद्या मला कवीश्रेष्ठ म्हण. शब्दांच्या खुराकावर जगते माझी काव्यस्फूर्ती. कागदाच्या तव्यावरती भाकर्या गीतांच्या भाजतो; भिऊ नकोस त्या खायला, अपचन होता “पाचक-गुटी” औषधालयात सहज मिळेल. सात घटका सात पळे असा मुहूर्त पाहिजे काय - काव्य माझे वाचायला आणि त्या दर्यात बुडायला? उद्याच्या माझ्या कवितेला आजचीचे मी दूध पाजतो. माझ्या "कवीश्रेष्ठ"-पदवीची भगवंताला सारी लाज. अंधाराच्या मांडीवरती जगतील माझी गीते सात, मरतील सात; निर्विकारपणे आकाश बसेल शेंगदाणे खात. आत्ताच वाच, आत्ताच वाच, माझी ही कविता आत्ताच वाच; उद्या रचीन नवी कविता. |
No comments:
Post a Comment