खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
आपणच आपल्याला | पहावीत मोदे उमलली फुले |
---|---|
आपणच आपल्याला लिहीलेली पत्र वाचता वाचता ओले होणारे डोळे पुसून फडफडू द्यावीत वा-यावर पानं थोडंसं हसून आपणच आपल्याला सांगावी कधी तरी एखादी गोष्ट आपणच गावं आपल्यासाठी रिमझिमत्या स्वराचं एखादं गाणं आपणच जपावेत मनात वा-यावर झुलणारे गवताचे तुरे एखादी दूरात धावणारी पायवाट जपावेत काही नसलेले भास जिथे आपल्यासाठी फुलं उमलतील अशी जागा सगळ्यांनाच सापडत नाही मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना आपणच द्यावेत थोडेसे श्वास कवयित्री : अनुराधा पाटील | आपणच रिकामपणी लिहीलेल्या कविता वाचता वाचता आपले डोळे विस्फारून काही वेळा पहावं आढ्याकडे! थोडंसं हसून, आपण दुसर्यांना सांगावी कधी तरी एखादी गोष्ट. न्हाणीघरात गावं आपणच मुकतकंठाने एखादं गाणं! आपण पहावेत नीट वा-यावर झुलणारे गवताचे तुरे - दिसता पायवाटेच्या कडेने; जपावी नीट निरीक्षणदृष्टी! आपल्यासाठी उमलतात फुलं अन् आपल्याभोवती फिरते जग - रजा देऊन ह्या कल्पनांना पहावीत मोदे उमलली फुले |
No comments:
Post a Comment