खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
मैत्रीण | स्वप्नातल्या मैत्रिणीचे उत्तर |
---|---|
स्वप्नातल्या माझ्या सखी कोणते तुझे गाव? कसे तुझे रंगरुप काय तुझे नाव? कशी तुझी रितभात? कोणती तुझी वाणी? कसे तुझ्या देशामधले जमीन, आभाळ, पाणी? लव्ह्याळ्याच्या मुळांतून झिरपताना पाणी त्यात पावले बुडवून तू ही गुणगुणतेस का गाणी? सुगंधित झुळका चार केसांमध्ये खोवून तू ही बसतेस ऊन कोवळे अंगावर घेऊन? काजळकाळ्या ढगांवर अचल लावून दृष्टी तू ही कधी आतल्याआत खूप होतेस कष्टी? कुठेतरी खचित खचित आहे सारे खास, कुठेतरी आहेस तू ही नाही नुसता भास. कवयित्री : शांता शेळके | उत्तरे देते तुझ्या प्रश्नांची - जळगाव माझे गाव सावळा रंग, रूप बेताचे ठमाकाकू माझे नाव. रीतभात खानदेशी खानदेशी वाणी माझी देशामधले जमीन-पाणी? पाणी मुन्शीपाल्टीचे, ठिबकते नळातून. लव्हाळे इथे मुळीच नाही पण घंगाळातले पाणी आंघोळीच्या वेळी डोईवरून घेता म्हणते मी “गंगा-भागीरथी” वार्याची एकही झुळूक येत नाही इथे चुकून कोण बसेल अंगावर घेऊन ग्रीष्मातले रणरण ऊन? पांढर्या मऊ ढगांवर अचल लावून दृष्टी सायंकाळी आकाशात, अनुभवते मी हृष्टी! नीट न कळते बोली मजला - “आहे सारे, नाही भास.” स्वप्न चालू असताना स्वप्नसृष्टी न खास भास! |
No comments:
Post a Comment