Sunday, July 10, 2011

(१८४) झोका.............................झोपाळ्यावर झोके घेताना एके दिवशी ...



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



झोका झोपाळ्यावर झोके घेताना
एके दिवशी ...



रेशीमपाशामधुनि सुटावे
म्हणता अधिकच गुरफटते मी
बसल्याठायी रुजेन म्हणता
दूरदूरवर भरकटते मी

आभाळाची होईन म्हणता
क्षणात झरझर येते खाली
कुशीत भुईच्या मिटेन म्हणता
जीव कळीतून उमलू पाही

असले झोके घेता घेता
माझे मजला उरले नाही
परकेपणीही हे नित्याचे
अजून झुलणे सरले नाही

कवयित्री : संजीवनी मराठे


रेशीमपाशामधुनि सुटावे
म्हणता अधिकच गुरफटते मी
बसल्याठायी रुजेन म्हणता
दूरदूरवर भरकटते मी

आभाळाची होईन म्हणता
क्षणात झरझर येते खाली
कुशीत भुईच्या मिटेन म्हणता
जीव कळीतून उमलू पाही

असले झोके घेता घेता
एके दिवशी उमग मज येई :
व्यापक दृष्टिकोन राखता
संपुष्टी ऐसे झुलणे येई.


No comments:

Post a Comment