Monday, July 11, 2011

(१८७) ह्या दु:खाच्या कढईची गा....................ह्या भांड्यांच्या कल्हईची गा



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



ह्या दु:खाच्या कढईची गा ह्या भांड्यांच्या कल्हईची गा



ह्या दु:खाच्या कढईची गा
अशीच देवा घडण असू दे;
जळून गेल्या लोखंडातहि
जळण्याची, पण पुन्हा ठसू दे
कणखर शक्ती, ताकद जळकट

मोलाची पण मलूल भक्ति
जशि कुंतीच्या लिहिली भाळी,
खिळे पाडुनि तिचे जरा ह्या
कढईच्या दे कुट्ट कपाळी
ठोकुनि पक्के, काळे, बळकट

फुटेल उकळी, जमेल फेस,
उडून जाइल जीवन-वाफ;
तरि सांध्यांतुन कढईच्या ह्या
फक्त बसावा थोडा कैफ
तव नामाचा भेसुर धुरकट.

कवी : बा. सी. मर्ढेकर



ह्या भांड्यांच्या कल्हईची गा
अशीच देवा घडण असू दे;
ज्या घडणीद्वारे, देवा
ठेवले अन्न त्यांमध्ये
यत्किंचित न कळकत असते.

मोलाची ती सुंदर कल्हई
कुणाच्याही लावावी भाळी,
निखार्‍यावर तापवून भांडी
कौशल्ये कल्हईवाला लावी
कल्हई ती पक्की, चंदेरी

फुटेल उकळी, जमेल फेस,
उडून जाइल काही वाफ;
पण कल्हईच्या आवरणाने
शिजवले अन्न न कळकता राही;
हरीनामाचा करते मी उच्चार!



No comments:

Post a Comment