खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
अनंताचे फूल | तर्कशुद्ध विचारसरणी |
---|---|
तुझ्या केसात अनंताचे फूल आहे, म्हणजे तुझ्याही अंगणात अनंताचे झाड आहे; ह्या जाणिवेने मी मोहरुन जातो. . . . . . . . . . . . . . नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यात एक तरल संबंध रुजून आलेला मी पाहतो. कवी : द.भा.धामणस्कर | तुझ्या केसात अनंताचे फूल आहे, म्हणजे तुझ्याही अंगणात अनंताचे झाड आहे; ह्या जाणिवेने मी मोहरुन जातो. शिवाय एकदा बसमधे तू नजीकच्या सीटवर बसली असता "रामतीर्थ" ब्राह्मी तेलाचा गंध तुझ्या केसांमधून माझ्या नाकी पोचला, निष्कर्ष, तू ते तेल वापरतेस. त्या जाणिवेने मी आणखीच मोहरुन जातो. कारण मी "रामतीर्थ" ब्राह्मी तेलाचा सेल्समन आहे. नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यात एक तरल संबंध रुजून आलेला मी पाहतो. (रुजून आलेल्या आपल्या तरल संबंधाची परिणती आपल्या लग्नगाठीत झाल्यानंतर “रा. ब्रा.” तेलाच्या बाटल्या तुला जन्मभर मोफत मिळतील हे तू चाणाक्षपणे ओळखशीलच.) |
No comments:
Post a Comment