Monday, July 11, 2011

(१८८) मातीची दर्पोक्ती...................................सूत्रधार



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



मातीची दर्पोक्ती सूत्रधार



घनधार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य
त्या तृषार्त भूवर आले नवचैतन्य,
उन्माद चढे, तो दर्प दरवळे भोंती
थरथरा कापली वर दर्भाची पाती
ते सुस्त धूलिकण गाऊ लागले गीत

कोलाहल घुमला चहूकडे रानात -
अभिमानी मानव! आम्हाला अवमानी!
बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी
त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी
की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळती
मातीवर चढणे एक नवा थर अंती!
दर्पणी पाहू द्या रमणी रूप दर्पात
वा बाहू स्फुरू द्या बलशाली समरात
पांडित्य मांडू द्या शब्दांचा आकांत

ते रूप, बुद्धी ती, शक्ती, आमुची भरती,
मातीवर चढणे एक नवा थर अंती!
कित्येक शिकंदर जग जिंकुनिया गेले
कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले,
कित्येक मनू अन् मुनी धुळीने गिळले.
स्मृतीतीलहि त्यांच्या ओळी अंधुक होती
मातीवर चढणे एक नवा थर अंती!
पाहून हासू ये तुमचे ताजमहाल
अन् गर्व किती तो! काल काय जिंकाल?

शेकडो ताजही जिथे शोभले काल
ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी
मातीवर चढणे एक नवा थर अंती!
धनवंत असू द्या, असु द्या दीन भिकारी
कुणी संत असू द्या वा पापी व्यभिचारी
इकडेच वाहते सर्वांची रहदारी
हो भस्म चितेवर सारी नीति-अनीती
मातीवर चढणे एक नवा थर अंती!
मरणोत्तर वाटे होइल आशापूर्ती

स्वर्गीय मंदिरे घ्यायाला विश्रांति
लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीती
त्या व्याकुळ मतीला इथेच अंतिम शांती
मातीवर चढणे एक नवा थर अंती!
ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण?
बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण?
मातीतच अंती त्याचेही निर्वाण?
स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती
मातीवर चढणे एक नवा थर अंती!

कवी : कुसुमाग्रज


बा माते, ऐकली मी तव दर्पोक्ती
सूत्रधार मी दिक्कालाचा, अता ऐक माझी उक्ती
असे अंश सत्याचा, पण चुकीची तव अभिव्यक्ती
न एकमती माणूस, अगे, प्रकृती जितक्या व्यक्ती,
असती गर्विष्ठ अज्ञाने जरी व्यक्ती काही रक्ती

कोलाहल घुमला नसे चहूकडे खास
जरी थोडे अभिमानी मानव अवमानती कोणालाही
बेहोष पाउले पडती त्यांची कुठेही
त्या मत्त पदांना जाणीव न येई कधीही -
की जगता आयुष्य कोणत्या प्रकारे
आयुष्यात माणसाच्या शांत वाहतात वारे.
दर्पणी पाहती रमणी काही रूप दर्पात
अन्‌ स्वशरीरसौष्ठवही काही तरुण दर्पणात;
हा खेळ यौवनाचा, का त्याबद्दल आकांत?

विचारवंत मरता मागे राहती त्यांच्या उक्ती
मातीवर चढतो एक नवा थर जरी त्यांच्या देहांती.
कित्येक शिकंदर जग जिंकुनी जरी गेले
कित्येक वाल्मिकीसुद्धा धरेवर जगून गेले,
कित्येक मनू अन्‌ मुनी अक्षय ठरले.
स्मृतीतील उक्ती त्यांच्या न कधी अंधुक होती
मातीवर चढतो एक नवा थर जरी त्यांच्या देहांती.
पाहून हासू येते, माते, तुजला ताजमहाल
पण विचारनिर्मिती, कलानिर्मिती ह्यांचा मी सूत्रधार.

शेकडो ताजही जिथे शोभले काल
ती प्रचंड नगरे आज तुझिया पोटी -
सत्य जरी ते, त्याबद्दल कशास खंती?
धनवंत असू द्या, असु द्या दीन भिकारी
कुणी संत असू द्या वा पापी व्यभिचारी
इकडेच वाहते, म्हणशी, सर्वांची रहदारी
पण भस्म चितेवर सारी नीति-अनीती??
क्षमस्व, माते, आहे केवळ एक ती तव भ्रांती
"मरणोत्तर" व्हायची काय आणिक आशापूर्ती?

स्वर्गीय मंदिरे घ्यायाला विश्रांती
बांधती जन ज्यांची असे श्रीमंती;
त्या अज्ञ जनांना जरी न मिळते शांती
विचारवंत मरता मागे राहती त्यांच्या उक्ती.
“ही क्षुद्र बाहुली” अशी अज्ञ तुझी जाण
पृच्छा तुझी माते, “सूत्रधार हा कोण?”
माते, सूत्रधारे ह्या केले तुज निर्माण
दिक्कालाचे, अणू-परिमाणूंचे कसे हो निर्वाण?
विचारवंत मरता मागे राहती त्यांच्या उक्ती.


No comments:

Post a Comment