खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
शुक्रतारा, मंद वारा | अद्भुतसृष्टीतून रुक्षसृष्टीत |
---|---|
शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला? तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा तू असा जवळी रहा लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवा अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा तू अशी जवळी रहा शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा तू असा जवळी रहा कवी : मंगेश पाडगांवकर | सर्व चालू असे नित्यागत : सूर्य "आहे”, चंद्र "आहे”, असती फिरत ग्रह नभातुनी आज तू डोळ्यात अपुल्या मुसळा पहा, न माझ्यातल्या कुसळा पहा मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला? तू परी समजून घे अंगार माझ्या डोळ्यातला अंतरीचा राग माझ्या आज गगना पोचला तू अता चिडीचाप रहा निलाजऱ्या रे तुझ्या न काही बिलगे जिवा अंतरीच्या स्पंदनाने थरकते सारी हवा भारलेल्या वेदनांनी भारलेला जन्म हा तू अता चिडीचाप रहा न होते स्वप्नी माझ्या भोगण्या ये जे जागेपणी दाटुनी अंगार आलाय् आज माझ्या लोचनी वाकला फांदीपरी वेदनांनी जीव हा तू अता चिडीचाप रहा |
No comments:
Post a Comment