खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
ये उदयाला नवी पिढी | नव्या जगाचे कविवर आम्ही |
---|---|
गतकाळाची होळी झाली धरा उद्याची उंच गुढी पुराण तुमचे तुमच्यापाशी ये उदयाला नवी पिढी ही वडिलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो चंद्रावरती महाल बांधू नको आम्हाला जीर्ण गढी देव्हाऱ्यातील गंधफुलांतच झाकून ठेवा ती पोथी अशी बुद्धीची भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी रविबिंबाच्या घासासंगे हवी कुणाला शिळी कढी? शेषफणेवर पृथ्वी डोले! मेरूवरती सूर्य फिरे! स्वर्गामध्ये इंद्र नांदतो! चंद्र राहूच्या मुखी शिरे! काय अहाहा बालकथा या एकावरती एक कडी दहा दिशांतून अवकाशातून विमान अमुचे भिरभिरते अणूरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते नव्या जगाचे नायक आम्ही तुम्ही पुजावी जुनी मढी कवी : वसंत बापट | हाती कागद-पेन्सिल घेऊनी कविता मी रचतो ही स्फूर्तिप्रद कविता लिहिण्या प्रतिभा लागते सही ही वडिलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो चंद्रावरती कविता बांधू नको आम्हाला तुमची मही देव्हाऱ्यातील गंधफुलातच झाकून ठेवा ती पोथी काव्य रचण्याची भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी? काव्यनिकर नव्या वहीत करतो हवी कुणाला जुनी वही? शेषफणेवर पृथ्वी डोले! मेरूवरती सूर्य फिरे! स्वर्गामध्ये इंद्र नांदतो! चंद्र राहूच्या मुखी शिरे! काय अहाहा काव्यविषय ते हाताळती प्रतिभाविरही दहा दिशांतून अवकाशातून प्रतिभा अमुची भिरभिरते अणूरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते नव्या जगाचे कविवर आम्ही तुम्ही पुजावी अमुची अही! |
निकर = संग्रह
मही = पृथ्वी
अही = बेंबी
कविता जन्माला घालताना "ट"ला "ट" जोडण्याच्या कामी किंवा तालाकरता अडीअडचणींच्या वेळी मराठीची आजी असलेली संपन्न संस्कृत भाषा कशी कामी येते ह्याची ही तीन छोटी उदाहरणे आहेत.
No comments:
Post a Comment