Tuesday, July 12, 2011

(१९१) आता असे करू या!.......................................वाटचाल



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



आता असे करू या! अनंताकडे
(की वेड्यांच्या इस्पितळाकडे?)
वाटचाल



आता असे करू या!

नाही म्हणायला आता असे करू या
प्राणात चंद्र ठेवू, हाती उन्हे धरू या

आता परस्परांची चाहूल घेत राहू
आता परस्परांच्या स्वप्नात वावरू या

नेले जरी घराला वाहून पावसाने
डोळ्यातल्या घनांना हासून आवरू या

गेला जरी फुलांचा हंगाम दूरदेशी
आयुष्य राहिलेले जाळून मोहरू या

ऐकू नकोस काही त्या दूरच्या दिव्यांचे
माझ्या-तुझ्या मिठीने ही रात्र मंतरू या

हे स्पर्श रेशमी अन् हे श्वास रेशमाचे
ये! आज रेशमाने रेशीम कातरू या

कवी : सुरेश भट








आता असे करू या!

नको नको म्हणू या की आता असे करू या
म्हणजे आता म्हणू या की आता असे करू या

आता म्हणून झाले की आता असे करू या;
आता असे करू या --

पुढे काय करू या हा प्रश्न सोडवू या
पण हा प्रश्न कसा सोडवू या --

हा नवीन प्रश्न प्रथम सोडवू या.
तो कसा सोडवू या हा नवीनतर प्रश्न प्रथम सोडवू या

पण मला गमते अता आपण झोपू या
आणि उद्या उठू या

आणि म्हणू या
आता असे करू या!
.
.
.
.
.



No comments:

Post a Comment