Thursday, July 14, 2011

(१९२) एका वटवृक्षाखाली.......................एका प्रयोगशाळेत



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



एका वटवृक्षाखाली एका प्रयोगशाळेत



एका वटवृक्षाखाली बसुनिया दोन श्वान
एकमेकांना सांगती अनुभव आणि ज्ञान.
एक वये वाढलेले,एक पिलू चिमुकले
वृध्द-बालकात होते काही भाषण चाललेले.

कोणा ठायी सापडले तुला जीवनात सुख?
वृध्द बालका विचारी त्याचे चाटुनिया मुख.

मला वाटते आजोबा,सुख माझ्या शेपटात
सदाचाच झटतो मी त्यास धराया मुखात.
माझ्या जवळी असून नाही मज गवसत
उगाचच राहतो मी माझ्या भोवंती फिरत.

अजाण त्या बालकाची सौख्य कल्पना ऐकून
क्षणभरी वृध्द श्वान बसे लोचन मिटून.

कोणाठायी आढळले तुम्हा जीवनात सुख?
तुम्ही वयाने वडील,श्वान संघाचे नायक.

बालश्वानाच्या प्रश्नाला देई जाणता उत्तर -
तुझे बोलणे बालका, बिनचूक बरोबर
परि शहाण्या श्वानाने लागू नये सुखापाठी
आत्मप्रदक्षिणा येते त्याचे कपाळी शेवटी.

घास तुकडा शोधावा वास घेत जागोजाग
पुढे पुढे चालताना पुच्छ येते मागोमाग.

कवी : ग. दि. माडगूळकर


एका पिंजर्‍यात दोन सुंदर उंदीर
बसले होते करत गप्पा जरा गंभीर.
एक वये वाढलेला, एक छोटे पिल्लू होते
वृध्द-बालकात होते आजोबा-नातू हे नाते.

सापडते का बाळा, तुला जीवनात सुख?
आजोबा नातवा विचारती त्याचे चाटुनिया मुख.

आजोबा, सापडते मज सुख माझ्या शोधात
चक्रव्यूहा-अंतीच्या चविष्ट चीज-तुकड्यात.
नाकी वास असून जरी नाही ते गवसत
ते शोधून भक्षिण्याचा प्रयत्न नसे मी सोडत.

सुजाण नातवाची ती वाणी ऐकून
आजोबा बसती क्षणभर लोचन मिटून.

मग उघडून लोचन आजोबा नातवा म्हणती -
शाबास पोरा, परमेश्वर प्रयत्नांती अशी असे सूज्ञोक्ती -

तैसाच वसे परमेश्वर प्रयत्नांमध्येही;
प्रयत्नांविना परमेश्वर नसे अंती न मध्येही
म्हणून शहाण्या उंदिरांनी न सोडावेत यत्न
तू असे एक शहाणे बालमूषकरत्न!

चीज- तुकडा शोधावा वास घेत जागोजाग
पुढे पुढे चालताना सुख येते मागोमाग.


No comments:

Post a Comment