Friday, July 15, 2011

(१९४) डोळ्यातल्या डोहामध्ये.....................डोह, गाभारा, पेला, आणि लाट



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



डोळ्यातल्या डोहामध्ये डोह, गाभारा, पेला, आणि लाट



डोळ्यातल्या डोहामध्ये
खोल खोल नको जाऊ;
मनातल्या सावल्यांना
नको नको, सखे, पाहू;

जाणीवेच्या गाभा-यात
जाऊ नको एकटीने;
गेलेल्यांना साधले का
व्यथेवीण मागे येणे?

व्यथेच्या या पेल्यातून
सत्याचे जे घेती घोट,
पूस त्यांना कसा कापे
पिता पिता धीट ओठ!

कवी : विंदा करंदीकर


माझ्या कवितांच्या डोहामध्ये
खोल खोल नको जाऊ;
माझ्या मनातल्या त्या चळांना
नको नको, सखे, हासू.

माझ्या कवितांच्या गाभा-यात
जाऊ नको एकटीने;
गेलेल्यांना साधले का
व्यथेवीण मागे येणे?

व्यथेच्या या पेल्यातून
भ्रांतीचे जे घेती घोट,
पूस त्यांना कशी बुडवे
माझ्या कवितांची लाट.


No comments:

Post a Comment