खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
तुकोबाच्या भेटी शेक्स्पीअर आला | तुकोबा भेटीला म्या कवीच्या आला |
---|---|
तुकोबाच्या भेटी| शेक्स्पीअर आला| तो झाला सोहळा| दुकानात|| जाहली दोघांची| उराउरी भेट| उरातले थेट| उरामध्ये|| तुका म्हणे "विल्या| तुझे कर्म थोर| अवघाची संसार| उभा केला"|| शेक्स्पीअर म्हणे| "एक ते राहिले तुवा जे पाहिले| विटेवरी"|| तुका म्हणे "बाबा| ते त्वा बरे केले| त्याने तडे गेले| संसाराला|| विठ्ठल अट्टल| त्याची रीत न्यारी| माझी पाटी कोरी| लिहोनिया"|| शेक्स्पीअर म्हणे| "तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळले| शब्दातीत"|| तुका म्हणे "गड्या| वृथा शब्दपीट| प्रत्येकाची वाट| वेगळाली|| वेगळीये वाटे| वेगळाले काटे| काट्यासंगे भेटे| पुन्हा तोच|| ऐक ऐक वाजे| घंटा ही मंदिरी| कजागीण घरी| वाट पाहे"|| दोघे निघोनिया| गेले दोन दिशा| कवतिक आकाशा| आवरेना|| कवी : विंदा करंदीकर | तुकोबा भेटीला| म्या कवीच्या आला| तो झाला सोहळा| म. सा. सम्मेलनी|| जाहली दोघांची| नमस्कृती-चमत्कृती। तुकाबाने आदर। विनये प्रकटीला|| तुका म्हणे "कविराजा| तुझे कर्म थोर| अवघाची संसार| टाकिलास ढवळोनी"|| मी कविराज म्हणे| "कसचे कसचे| जे म्या डोळां पाहिले| ते उतरले काव्यी"|| तुका म्हणे "बाबा| ते त्वा बरे केले| उद्धरूनी टाकिले त्वा| अवघ्या संसाराला|| विठ्ठल अट्टल| त्याची रीत न्यारी| माझी पाटी कोरी| लिहोनिया"|| मी कविवर म्हणे| "माझ्या शब्दांनी, बा| धूळ चारली मी| शब्दातीता"|| तुका म्हणे "कविश्रेष्ठा| अचाट शब्दपीट| तुझी प्रतिभा रे। वेगळाली|| वेगळीये वाटे| वेगळाले कवी| हिणकस कवितांचा| ढीग रचती|| ऐक ऐक वाजे| घंटा सभास्थानी| तुझी व्यासपीठी। खुर्ची वाट पाहे"|| ऐसे म्हणोनिया| विमानी बसला तुका| वैकुंठी आकाशमार्गे| परताया|| |
टीप :
म. सा.सम्मेलन = मराठी साहित्य सम्मेलन
(कवितेत ताल ठेवण्याकरता प्रसंगी शब्दसमुच्चयांची संक्षिप्त रूपे वापरणे इत्यादी युक्त्या कवितांचे कारखानदार कसे करत असतात ह्याचे हे एक उदाहरण आहे.)
No comments:
Post a Comment