खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
तरुणपणी | तरुणपणी |
---|---|
तरुणपणी त्याने एकदा दर्यामध्ये लघवी केली. आणि आपले उर्वरित आयुष्य त्यामुळे दर्याची उंची किती वाढली हे मोजण्यात खर्ची घातले. कवी : विंदा करंदीकर | तरुणपणी त्याने एकदा दर्यामध्ये एका बुडत्याचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात आपले प्राण गमावले. त्यामुळे दर्याची उंची फूटभर वाढली. |
तरुणपणी | तरुणपणी |
---|---|
तरुणपणी त्याने एकदा दर्यामध्ये लघवी केली. आणि आपले उर्वरित आयुष्य त्यामुळे दर्याची उंची किती वाढली हे मोजण्यात खर्ची घातले. कवी : विंदा करंदीकर | तरुणपणी त्याने एकदा दर्यामध्ये मनमुराद सर्फिंग् केले. आणि आपल्या उर्वरित आयुष्यात त्या घटनेचा आपल्या कल्पनासृष्टीत पुष्कळदा पुनरानुभव घेतला. |
तरुणपणी | साहसे |
---|---|
तरुणपणी त्याने एकदा दर्यामध्ये लघवी केली. आणि आपले उर्वरित आयुष्य त्यामुळे दर्याची उंची किती वाढली हे मोजण्यात खर्ची घातले. कवी : विंदा करंदीकर | तरुणपणी एकदा दर्यामध्ये कोलंबस-वास्कोदगामादिकांनी जहाजे हाकारली. आणि त्यामुळे माणसाच्या इतिहासावर काय काय परिणाम झाले ह्याचा आढावा घेणारे ग्रंथ इतिहासकारांनी रचले. |
तरुणपणी | जलपर्यटन |
---|---|
तरुणपणी त्याने एकदा दर्यामध्ये लघवी केली. आणि आपले उर्वरित आयुष्य त्यामुळे दर्याची उंची किती वाढली हे मोजण्यात खर्ची घातले. कवी : विंदा करंदीकर | तरुणपणी त्याने एकदा दर्यामध्ये एका ऐशआरामी जहाजातून जलपर्यटन करताना लोकांना स्फूर्तीपर अशा काही स्वार्थत्यागविषयक कविता रचल्या. त्या कवितांमधल्या अतिपरिणामकारक शब्दांमुळे त्याची उंची लोकांमधे फूटभर वाढली. |
तरुणपणी | आपल्या पन्नाशीपर्यंत |
---|---|
तरुणपणी त्याने एकदा दर्यामध्ये लघवी केली. आणि आपले उर्वरित आयुष्य त्यामुळे दर्याची उंची किती वाढली हे मोजण्यात खर्ची घातले. कवी : विंदा करंदीकर | आपल्या पन्नाशीपर्यंत त्याने पुष्कळ कविता रचल्या. आणि आपले उर्वरित आयुष्य त्यामुळे मराठी साहित्याची उंची किती वाढली हे मोजण्यात खर्ची घातले. |
No comments:
Post a Comment