Saturday, July 16, 2011

(१९७) तसेच घुमते शुभ्र कबूतर.................नसे मुळी मी घुमते कबूतर



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



तसेच घुमते शुभ्र कबूतर नसे मुळी मी घुमते कबूतर



मनात माझ्या उंच मनोरे
उंच तयावर कबूतरखाना;
शुभ्र कबूतर घुमते तेथे
स्वप्नांचा खाउनिया दाणा.

शुभ्र कबूतर युगायुगांचे-
कधी जन्मले? आणि कशास्तव?
किती दिवस हे घुमावयाचे?
अर्थावाचुन व्यर्थ न का रव?

प्रश्‍न विचारी असे कुणी तरि;
कुणी देतसे अगम्य उत्तर?
गिरकी घेऊन आपणाभवती
तसेच घुमते शुभ्र कबूतर.

कवी : विंदा करंदीकर


मनात माझ्या अनंत गगन
विरहे एक गरुड तयात -
त्याच्या आजूबाजू न कोणी -
पूर्ण स्थिरप्रज्ञावस्थेत

विहरणे त्याचे युगायुगांचे
प्रश्नांवाचुनी झेनमुनीपरी
"यथास्ति तथास्तु" ज्ञानी विचारे
अर्थार्थे न दवडीत वैखरी

प्रश्‍न विचारी जरी कुणी तरी;
त्यास त्याचे मुके उत्तर
प्रदीर्घ घेता गिरकी आकाशी
“नसे मुळी मी घुमते कबूतर."


No comments:

Post a Comment