खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
तीर्थाटन | टुण टुण उड्या मारत "तीर्थाटन" |
---|---|
तीर्थाटन मी करीत पोचलो नकळत शेवट तव दारी; अन् तुझिया देहात गवसली सखये, मजला तीर्थे सारी अधरावरती तव वृंदावन प्रयाग सापडले नेत्री; भालावरती ते मानससरोवर, मानेवरती गंगोत्री गया तुझ्या गालात मिळाली रामेश्वर खांद्यावरती मिळे द्वारका कमरेपाशी अन काशी अवतीभवती मोक्षाचीही नुरली इच्छा नको कृपा याहून दुसरी तीर्थाटन मी करीत पोचलो नकळत शेवट तव दारी. कवी : विंदा करंदीकर | "तीर्थाटन" माझे बावीस उमरीचे संपवून झटपट आलो तव दारी महाविद्यालयी असता शिकता झेप माझी होती भारी वृंदावन बावीस उमरीत प्रयाग आणि मानससरोवर त्रिस्थळी त्या सहली केल्या अन् पाहिली गंगोत्री त्याउप्पर इतकेच काय, गया रामेश्वर द्वारका काशी आणि परिसर हिंडून झाले मित्रांच्या सवे, शिवाय दिल्ली, आग्रा, जयपूर मोक्षाची कधी नव्हतीच इच्छा हॉर्मोन्सनी न कधी सोडला पिच्छा “तीर्थाटन” कसले, संपवून सहली सखे, अता मी करतो सीधी पृच्छा : “स्वीकारशील का ह्या फुलांच्या गुच्छा?” |
No comments:
Post a Comment