Sunday, July 24, 2011



(२११) लाला टांगेवाला...............................................आला विदूषक लाला






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






लाला टांगेवाला आला विदूषक लाला


लाल टांगा घेऊनी आला
लाला टांगेवाला
ऐका, लाला गातो गाणे
लल्ल लल्ल लल्ल ला

कुडता लालेलाल
त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल
त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल गोंडा उडवित
आला टांगेवाला
ऐका, लाला गातो गाणे
लल्ल लल्ल लल्ल ला

टांगा लालेलाल
त्याचा घोडा लालेलाल
चाबुक लालेलाल
त्याचा लगाम लालेलाल
लालेलाल चाबूक उडवित
आला टांगेवाला
ऐका, लाला गातो गाणे
लल्ल लल्ल लल्ल ला

लाल परकर नेसून आली
लीला बोले त्याला
"चल रे लाला, ने रे मला
माझ्या गावाला"
लीला बसली टांग्यामध्ये
टांगा सुरू झाला
ऐका, लाला गातो गाणे
लल्ल लल्ल लल्ल ला
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झाडे लालेलाल
त्यांची फुले लालेलाल
रस्ता लालेलाल
त्याचा धुरळा लालेलाल
लालेलाल धुरळा उडवित
गेला टांगेवाला
ऐका, लाला गातो गाणे
लल्ल लल्ल लल्ल ला

कवी : नारायण गोविंद शुक्ल






लांब टांगा मारत आला
आला विदूषक लाला
ऐका, लाला गातो गाणे
लल्ल लल्ल लल्ल ला

कुडता लालेलाल
त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल
त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल नाक उडवित
आला विदूषक लाला
ऐका, लाला गातो गाणे
लल्ल लल्ल लल्ल ला

लालाची दहा फूट उंच
घोडेकाठी लालेलाल
सर्कशीतल्या तंबूमधली
जमीन लालेलाल
लालेलाल चाबूक उडवित
आला विदूषक लाला
ऐका, लाला गातो गाणे
लल्ल लल्ल लल्ल ला

लाल परकर नेसून आली
लैला तंबूच्या मध्याला
म्हणे लालाला, "चल रे लाला,
ने माझ्या गावाला"
म्हणे लाला लैलाला
“तुझा गाव कुठला, लैला?"
लैला म्हणे फुगवुनी गाल
“गाव माझे नैनिताल"

"चल ये चढून घोडेकाठीवर"
म्हणे लाला लैलाला
लैला चढली घोडेकाठीवर
चिकटून बसली लालाच्या खांद्याला
लाला गाई आपल्याशीच
“नैनिताल, नैनिताल"
लाला गात असताना
लैलाने धरला ताल

गाता गाता झाडे लाला
गुलाल लालेलाल
झालीत लैला आणि लाला
दोघे लालेलाल
चकरा मारून तीन रिंगणी
म्हणे लैलाला लाला
“उतरा खाली, राणीबाई,
आले नैनिताल”

उतरली खाली घोडेकाठीवरुन
लैला लालेलाल
परतली लैला आणि लाला
तंबूमागे, लल्ल लल्ल लल्ल ला


No comments:

Post a Comment