खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
कोलंबसाचे गर्वगीत | एका राजकारण्याचे गर्वगीत |
---|---|
हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा? त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा? कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा मानवतेचे निशाण मिरवू महासागरात जिंकुनी खंड खंड सारा चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!" कवी : कुसुमाग्रज | हजार जिव्हा तुझ्या घोषू दे; प्रतिस्पर्धी मी तुझा हे ओळखून तू घे रे विराट त्सुनामी निर्मू शके मी, पर्वत पाण्याचे तुज जलसमाधी देणारे ताम्रसुरा प्राशुन विलायती, सांग, दडशील कुठे तू पाताळी सातां? दडलास तिथे तरी दुभंगून धरणीला, मी येईन पाजळून पलिता! स्वर्गातून अवतरलेलो मी, कराया तव धुव्वा असे उद्युक्त मी, तू जाण जमवुनि मेळा गुंडांचा मी या धरतीवरती करतसे तांडव थैमान पादाक्रांत कराया निवडणूक जी आहे चालू - माझी मोठ्ठी मोहीम असे मिरवणूक निवडणुकीनंतरची माझी माझ्या मनश्चक्षूंना दिसे सहकार्यांनो, विसरू नका कधी, जन्म तुमचा आहे झुंजण्या अखंड संग्राम सवित्यापरी असीम अस्मानामध्ये संचरावे हे लक्ष्य माझे ठाम! काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा? विजय निवडणुकीमधे मिळवणे, हेची एक ध्येय अपुले तुम्ही जाणा कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती राजकारणात संचरत असतो मी परी सत्तेची असती क्षितिजे पुढती मार्ग आमचा कोण रोधू शकते सत्ता-संपत्तीप्राप्तीप्रती सांगा, असे कुणाची छाती? पक्षाचे माझ्या निशाण आम्ही मिरवू महाराष्ट्रात जिंकुन निवडणूक येती चला उभारा उंच शिडे ती गर्वाने वरती, घालू गवसणी सागराला अनंत माझी सत्तासक्ती अनंत अन् आसक्ती माझी पैका जमवायाला! |
No comments:
Post a Comment