Saturday, July 23, 2011



(२०९) असाच..........................................................मुरलेल्या राजकारण्याप्रत






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






असाच मुरलेल्या राजकारण्याप्रत



वेगळीच जात तुझी;
वेगळाच ताल
तू अफाट वाट तुझी
एकटाच चाल

एकटाच चालत जा
दूर दूर दूर
गात गात तूच तुझा
एकटाच सूर

एकटाच चालत जा
उंच आणि खोल;
बोल आणि ऐक पुन्हा
तू तुझा बोल

तू असाच झिंगत जा
विस्मरून पीळ
तू असाच फुंकीत जा
अर्थशून्य शीळ

अंतरात पाहत जा
भास तू तुझेच;
शांततेत ऐकत जा
श्वास तू तुझेच

खोल या दरीत अशा
गर्द साऊलीत
हो निमग्न तूच तुझ्या
मंद चाहुलीत

कवी : ना. घ. देशपांडे


वेगळीच जात तुझी;
वेगळाच तोरा
तिरकी वाट तुझी तू
चालशी बिनघोरा

असतो तुजभोवती
स्तुतिपाठकांचा मेळा
गाती तुझे स्तवन ते
मिळवून गळ्यात गळा

अविरत देत जाशी
खोल आणि फोल
बोल तुझे भाषणांमधुनी
न ऐकती कुणी तुझे बोल

तू असाच जाशील
न विस्मरून पीळ
तू असाच जाशील फुंकत
अर्थशून्य शीळ

सगळीकडे पाहशील
भास तू तुझेच;
शांततेत ऐकशील
श्वास तू तुझेच

खोल राजकारणाच्या
घनदाट अरण्यात
फिरत तू राहशील रत
धूर्त हालचालीत


No comments:

Post a Comment