Wednesday, July 20, 2011



(२०८) *****(१) बकान्योक्ती......................................बकान्योक्ती
***********(२) कोकिलान्योक्ती..................................राजकारण्यन्योक्ती
***********(३) शुकान्योक्ती .....................................शुकान्योक्ती






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






बकान्योक्ती बकान्योक्ती



उभा राहे एके चरणि धरणीते धरुनीया
तपश्चर्या वाटे करित जणु डोळे मिटुनीया,
बका ऐशा ढोंगे तव अमति मासेच ठकती,
परि ज्ञाते तूझे कपट लवलाही उमजती.

कवी : कृष्णशास्त्री चिपळूणकर


उभा राहे एके चरणि धरणीते धरुनीया
तपश्चर्या वाटे करित जणु डोळे मिटुनीया;
निसर्गक्रमे करी बक उदरभरण पकडून मासे
निसर्गक्रमी उदरभरणी "कपट", "ढोंग" कैसे?






कोकिलान्योक्ती राजकारण्यन्योक्ती



येथे समस्त बहिरे वसताती लोक,
का भाषणे मधुर तू करिशी अनेक.
हे मूर्ख त्यांस किमपीहि नसे विवेक,
वर्णावरून तुजला गणतील काक.

कवी : कृष्णशास्त्री चिपळूणकर



येथे समस्त हुशार वसताती लोक,
जरी भाषणे मधुर तू करिशी अनेक.
ते सूज्ञ त्यांस असे नीरक्षीरविवेक,
विलंबाविना तुजला जाणतील काक;
तरी सल्ला राजकारणत्याग तू करून टाक!







शुकान्योक्ती शुकान्योक्ती



फळे मधुर खावया असति नित्य मेवे तसे,
हिरेजडित सुंदरी कनकपंजरीही वसे,
अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे,
स्वतंत्र वनवृत्तिच्या घडिघडी सुखाते स्मरे.

कवी : कृष्णशास्त्री चिपळूणकर


















पंजरी शुक दुःखे झुरे न झुरे
अहर्निशे वा अंतर्‍यापायरे -
विहगमानसतज्ञाही अज्ञात असे.
पंजरी शुकदुःख जरी शक्य असे
दुःखाभावही शक्य असे.

विहगमानस मनुजमानस भिन्न असे;
मनुजबुद्ध्युत्क्रांती त्या बुडाशी असे.

स्वातंत्र्य माणसा प्रिय असे
जेवि ते मनःसौख्यसाधन भासे.
पण अतिमहत्त्वाची गोष्ट अशी असे -
जबाबदारीविण स्वातंत्र्यी मनःसौख्य नसे;
परमनःसौख्य तर मुळीच नसे.

अता, फळे मधुर खावया मिळता नित्य मेवे
वातानुकूल महाली जर राहण्या मिळावे
“काव्यशास्त्रविनोदा"दी सुविधाही कुणी द्यावे -
अशा परिस्थितीत काही मनुजमात्रे
सुखे दिनक्रमणा करतील हे सत्य कोण नाकारे?
“व्यक्ती तितक्या प्रकृती” हे शेवटी असे खरे.

No comments:

Post a Comment