खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
मराठी असे आमुची मायबोली | मिंग्लिश आमुची नवी मायबोली |
---|---|
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढे दिव्य आशा असे जरी पंचखंडातही मान्यता घे स्वसत्ताबळे श्रीमती इंग्रजी मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवी त्यजी जरी मान्यता आज हिंदीस देई उदेले नवे राष्ट्र हे हिंदवी मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता, थोरवी असू दूर पेशावरी, उत्तरी वा असू दक्षिणी दूर तंजावरी मराठी असे आमुची मायबोली अहो ज्ञानदेवीच देखा खरी मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असू पुरी बाणली बंधुता अंतरंगी हिच्या एक ताटांत आम्ही बसू हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे हिला बैसवू वैभवाच्या शिरी हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा नका फक्त पाहू हिच्या लक्तरां प्रभावी हिचे रूप चापल्य देखा पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा न घालूं जरी वाङमयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने "मराठी असे आमुची मायबोली" वृथा ही बढाई सुकार्याविणे मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यांत ही खंगली हिची थोर संपत्ति गेली उपेक्षे- मुळे खोल कालार्णवाच्या तळी तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्ने नियोजू तयांना हिच्या मंडणी नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी कवी : माधव ज्यूलियन | मराठी जरी आमुची मायबोली अम्हा ती भाषा न बोलता येत असे नसे आज ऐश्वर्य त्या माउलीला अन् आशा यशाची मोजकीच असे घेतसे पंचखंडातही मान्यता जी कशाहीमुळे श्रीमती इंग्रजी न बोलता येई वा न लिहिता भाषाही ती अम्हा फारशी "राष्ट्रभाषा" अशी मान्यता हिंदीस आज जरी होती झाली तत्संबंधी वादावादी असो, जन “मराठी" मिंग्लिश भाषेस ध्याती चाणाक्ष जाणतीलच "मिंग्लिश” ही उपाधी असू दूर पेशावरी, नॉर्थमध्ये असू दक्षिणी दूर तंजावरी मिंग्लिश न्यू आमुची मायबोली नव्या काळातली धेडगुजरी मिंग्लिश न्यू आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असू पुरी भिनली ती असे अंतरंगी तिच्या अंमलात आम्ही असू तिचे पुत्र आम्ही ती "फाडफाड" बोलू चांगल्या मराठीस लावुनीया सुरी “जगन्मान्यता" तीस अर्पू सहजी बसूनी आम्ही कट्ट्याकट्ट्यांवरी मराठीच्या चिंध्यांची नसे लाज आम्हा पहायचे कशासी तिच्या लक्तरां मिंग्लिशचे प्रभावी रूप चापल्य जाणा पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा न घालण्या समर्थ आम्ही नकलीही मराठीवरी दागिने "मिंग्लिश ही आमुची मायबोली" अशी बढाई परी आम्ही करणे मराठी मायबोली अमुच्या पुर्या गबाळेपणी खंगली तिची थोर संपत्ति गेली उपेक्षे- मुळे खोल कालार्णवाच्या तळी वाक्यरचना, व्याकरण, ह्रस्वदीर्घ शुद्धलेखन आणि विरामचिह्ने - गबाळेपणा तत्संबंधित जो आम्ही करतो संपण्याची तो न असती चिह्ने! |
No comments:
Post a Comment