Wednesday, July 6, 2011

(१७६) अंधार असा घनभारी................................पहारेकरी गुरखा



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



अंधार असा घनभारी पहारेकरी गुरखा



अंधार असा घनभारी
चंद्रातुन चंद्र बुडाले
स्मरणाचा उत्सव जागून
जणु दुःख घराला आले

दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला
श्वासानी धरते उचलुन

विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणु ह्रिदयामागुन माझ्या
झाडांची पाने गळती

नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे

कवी : ग्रेस


अंधार असा घनभारी
पाच त्यात चंद्र बुडाले
दिवसा झोपून, रात्री जागून
मी बसता एक कुत्रे सोबतीला आले

चौकीवर मी बसलेला
खुर्च्या दोन घेऊन, एकीवर पाय पसरून
क्षितिज जसे धरणीला
श्वासानी धरते उचलुन

निःस्तब्ध असे परिसर
दूर कुठे भुंकती कुत्री
घड्याळातले अन्‌ माझ्या
सेकंद-सेकंद ठिबकती

नाहीच कुणी गप्पाटप्पांना
टेलिफोन असूनही जवळी
पण उजाडण्याच्या वेळी
अकेलाभाव हळूहळू निवळी


No comments:

Post a Comment