Monday, July 25, 2011



(२१३) बघ, आई, आकाशात सूर्य हा आला..............बघ, आई, गावात पुढारी कोणीसा आला






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






बघ, आई, आकाशात सूर्य हा आला बघ, आई, गावात
पुढारी कोणीसा आला



बघ, आई, आकाशात सूर्य हा आला
पांघरून अंगावरी भरजरी शेला

निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी
मोतीयांच्या लावियेल्या आत झालरी

केशराचे घातलेले सडे भूवरी
त्यावरून येई त्याची डौलाने स्वारी

डोंगराच्या आडून हा डोकावे हळू
आणि फुले गुलाबाची लागे ऊधळू

नभातून सोनियाच्या ओती तो राशी
गुदगुल्या करी कश्या कळ्या फुलांसी

पाखरांच्या संगे याची सोबत छान
गाती बघ कशी याला गोड गायन

मंद वारा जागवितो सार्‍या जगाला
म्हणतसे उठा उठा मित्र हा आला

कवयित्री : शांता शेळके


बघ, आई, गावात पुढारी कोणीसा आला
पांघरून अंगावर सफेत खादीचा डगला

कोणी म्हणे त्याच्या महाला खांब सोनेरी
मोतीयांच्या लावियेल्या आत झालरी

केशराचे घातले सडे मुलींनी भूवरी
त्यावरून येई त्याची डौलाने स्वारी

अनुयायी-जथ्यातून तो चाले ह्ळू हळू
आणि फुले गुलाबाची लागती मुली ऊधळू

नभातून सोनिया ओती आशीर्वचने
गुदगुल्या होती पुढार्‍या सगळ्या दृश्याने

स्तुतिभाटांची असे त्याला सोबत छान
गाती बघ ते त्याचे गोड स्तुतिगान

मंद वारा जागवितो सार्‍या जगाला
म्हणतसे उठा उठा पुढारी हा आला


No comments:

Post a Comment