Tuesday, July 26, 2011



(२१४) पतंग उडवू चला.............................................पतंग उडवू चला






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






पतंग उडवू चला पतंग उडवू चला


पतंग उडवू चला
गडयांनो, पतंग उडवू चला.

रंग ढगांवर मावळतीचा
लाल पिवळसर किती मजेचा
झुळझुळ वारा नदीकाठचा
बाजूस डोंगरमळा.


करू चला सुरवात बरोबर
सोडा, सोडा रीळ भराभर
पंतग चढवा हे वार्‍यावर
ढगांस भेटायला.


मऊमऊ वाळूत पाय रोवुनी
देऊ झटका दोरा ओढुनी
पतंग जातील वर वर चढुनी
पंख नको त्यांजला.


जशी पाखरे आभाळात
पंख पसरुनी तरंगतात
दिसतील तैसे पतंग रंगीत
खेळ किती चांगला !


सूर्य डोंगराआड लपेल
काळा बुरखा जग घेईल
खेळ तोवरी हा चालेल
मजेदार आपुला.

कवी : अ.ज्ञा. पुराणिक


पतंग उडवू चला
गडयांनो, पतंग उडवू चला.

पतंग उडतो आकाशी
वार्‍यांच्या प्रवाहांनी
वारे वाहती आकाशी
विविध जागी असलेल्या
भिन्न हवादाबांनी.

पतंगाच्या दोरीद्वारे
ओढशक्ती लावून आपण
बर्‍याच अंशी तो स्थिर जागी
राखू शकतो ह्या किमयेची
आपण राखू या मनी जाण.

पतंग राखतो आपली दृष्टी
सदैव त्याकडे अन्‌ आकाशाकडे
तद्वत्‌ ध्येयाकडे आपली दृष्टी
सदैव राखता आपल्या पदरी
ध्येययदृष्टीतले परमसौख्य पडे

पतंग राखतो आपली दृष्टी
सदैव त्याकडे अन्‌ आकाशाकडे
आकाशाकडे असता आपली दृष्टी
निसर्गातल्या अनंततेचे
दर्शन निदान ओझरते घडे

पतंग अन्‌ बेंजॅमिन्‌ फ्रॅंकलिन्‌
यांचे मनोहर नाते असे
पतंग उडवून आर्द्र आभाळी
विद्युल्लतेचे तये रूप उलगडले
कुशाग्रबुद्धीचे इथे रूप दिसे.


No comments:

Post a Comment