Wednesday, July 27, 2011



(२१५) घननीळ...............................................................घननाद






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






घननीळ घननाद

घननीळ सागराचा घननाद येतो कानी
घुमती दिशा दिशात लहरीमधील गाणी

चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत

आकाश तेज भारे माडांवरी स्थिरावे
भटकी चुकार होडी लाटात संथ धावे

वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा

जलधीबरोबरीचे आभासमान नाते
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे

सांनिध्य सागराचे आकाश पांघराया
परी साथ ना कोणाची अस्तित्व सावराया

कवी : विद्याधर सीताराम करंदीकर
चालू असे सागराचा घननाद निशी-दिनी
जन ऐकती तो दिनी, न ऐके निशी कुणी

दिनी चमकती दिनकरकिरण लहरींवर
रजनी विहरती रजनीकरकिरण तयांवर

दिनी सवितृतेज तीरी माडांवरी पाजळे
निशी चंद्रप्रकाश तयां चंदेरी उजळे

वाळूत स्तब्ध जरी रेखाकृती किनारा
कर्कादिकांचा वाळूत चालू असे गुजारा

निसर्गवैभव अमाप दिसे जरी सगळीकडे
जलधीसमान आभा कुठे असे दुसरीकडे?

सांनिध्य सागराचे भूप्रदेशा असे जे
तयाविण प्राणिमात्रजीवन असे शक्य कैचे?

1 comment: