Wednesday, July 27, 2011



(२१६) हेही असेच होते...................................काल तसेच होते






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






हेही असेच होते काल तसेच होते

हेही असेच होते, तेही तसेच होते.
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!

केले न बंड कोणी.. त्या घोषणाच होत्या!
ज्यांनी उठाव केला तेही घसेच होते!

आला न गंध त्यांना केव्हाच चंदनाचा;
सारे उगाळलेले ते कोळसेच होते!

तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही!
तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते!

होती न ती दयाही.. ती जाहिरात होती!
जे प्रेम वाटले ते माझे हसेच होते!

झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी.
मातीत पावलांचे काही ठसेच होते!

कवी : सुरेश भट
हे काव्य आज आहे काल तसेच होते
न त्यात बदल काही, सारे उसासेच हो, ते!

नका व्यर्थ पाहू अर्थ कवितांत माझ्या
अंतर्गोल-बहिर्गोल जणू आरसेच हो, ते!

होता न गंध त्यांना केव्हाच आशयाचा;
सारे उगाळलेले ते कोळसेच होते!

तू भेटलीस तेव्हा मी टाकले उसासे
तू भेटतेस तेव्हा माझे तसेच होते!

ते होते माझे उसासे, न जलसे
गल्ली-बोळातले ते केवि वळसेच होते.

म्हणा माझ्या मनाचे ते होते कवडसे
कागदावर उमटवलेले शब्दांचे ठसेच होते!

No comments:

Post a Comment