खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
हासताना प्राण गेला | वाचताना मी काव्य माझे |
---|---|
हासताना प्राण गेला का तुला आले रडे? हे पहा हे लोक सारे कोरडेच्या कोरडे! का अशी मागून ही ढाळशी तू आसवे? संपलो केव्हाच मी त्या तुझ्या स्वप्नासवे. तारकांनाही न आता खूण माझी सापडे! तू असा छेडू नको अंतरीचा जोगिया; हो चिता माझी पुन्हा लागली जगावया. ही पहा ही राख माझी वारियासंगे उडे! एकदा नेत्री तुझ्या चांदणे मी वेचले; एकदा ओठी तुझ्या गीत माझे गुंफिले. आज अस्थाईच माझी अंतऱ्यापाशी अडे! कवी : सुरेश भट | वाचताना मी काव्य माझे का हसू आले तुला? ते पहा लोक सारे म्हणती, ’सत्वरी पळा!’ दर्दभरी कहाणी माझी ढाळतो मी आसवे संपलो भासे अता मी ह्या तुझ्या हासूसवे. गमे, न तारकांनाही कळती पूर्ण माझ्या कळा. स्वप्ने माझी नको दुभंगू करतो मी गयावाया, जी मला मदत करती जाग येता जगावया. तू असा फोडू नको भ्रमाचा माझ्या भोपळा. एकदा तुझ्या समोर मी होते काव्य माझे वाचले जोडुनी “ट”ला “ट” प्रयासे होते मी जे गुंफिले. त्याही काव्याला तू हसता खिन्नता आली होती मला. |
No comments:
Post a Comment