खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी | ये तू इकडे नवी गार्हाणी ऐकण्यासाठी |
---|---|
हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी तूच नाहीस इथे हात धरायासाठी! चेहरा तो न इथे, ही न फुलांची वस्ती, राहिले कोण आता सांग झुरायासाठी! कालचे तेच फिके रंग नकोसे झाले दे तुझा ओठ नवा रंग भरायासाठी! आडवी एक तिथे भिंत मनाची आली दार होतेच कुठे आत शिरायासाठी! नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू? ये गडे, आज उभा जन्म चिरायासाठी! कवी : सुरेश भट | ही काठी मज मदत करे फिरायासाठी तूच नाहीस इथे हात धरायासाठी पहारा न इथे, न घाली कोणी गस्ती राहिले कोणी आता नाही सुरक्षेसाठी कालचे फिके रंग नकोसे झाले सज्ज असे आजचे फिके रंग पहायासाठी आडवी एक इथे भिंत उभी आहे दार तिच्यात नसे आत शिरायासाठी नेहमीचीच जुनी गार्हाणी कशा गाऊ? ये तू इकडे नवी गार्हाणी ऐकण्यासाठी |
No comments:
Post a Comment