खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
संथ निळे हे पाणी | वीज |
---|---|
संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा कुरळ्या लहरींमधुनी शीळ घालतो वारा दूर कमान पुलाची एकलीच अंधारी थरथरत्या पाण्याला कसले गुपित विचारी भरून काजव्याने हा चमके पिंपळ सारा स्तिमित होऊनी तेथे अवचित थबके वारा किरकिर रातकिड्यांची निरवते किनारी ओढ लागुनी छाया थरथरते अंधारी मध्येच क्षितीजावरुनी वीज लकाकुन जाई अन् ध्यानस्थ गिरीही उघडुनी लोचन पाही हळुच चांदणे ओले थिबके पाण्यावरुनी कसला क्षण सोनेरी उमले प्राणामधुनी संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा दरवळला गंधाने मनाचा गाभारा कवी : मंगेश पाडगांवकर |
संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा कुरळ्या लहरींमधुनी शीळ घालतो वारा दूर कमान पुलाची एकलीच अंधारी थरथरत्या पाण्याला कसले गुपित विचारी भरून काजव्याने हा चमके पिंपळ सारा स्तिमित होऊनी तेथे अवचित थबके वारा किरकिर रातकिड्यांची निरवते किनारी ओढ लागुनी छाया थरथरते अंधारी मध्येच क्षितीजावरुनी वीज लकाकुन जाई अन् ध्यानस्थ गिरीही उघडुनी लोचन पाही आणि दिसे त्याला विजेच्या क्षणिक प्रकाशात चालता सावधान एक चोर गाठोडे धरून हातात काय नशीब त्या चोराचे - कडाडली वीज पुन्हा एक उतरली ती जमिनीवरती अन् करी चोरा विकलांग |
No comments:
Post a Comment