Thursday, June 27, 2013



(२२१) समजावुनी व्यथेला.......................................................आकाशवाणी






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






समजावुनी व्यथेला आकाशवाणी



समजावुनी व्यथेला समजावता न आले !
मज दोन आसवांना हुलकावता न आले !

सर एक श्रावणाची आली … निघून गेली…
माझ्या मुक्या तृषेला पण बोलता न आले !

सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा;
माझ्याच उत्तराला मज शोधता न आले!

चुकवूनही कसा हा चुकला न शब्द माझा
देणे मलाच माझे नाकारता न आले !

लपवीत गीत माझे पळ काढला तरीही
हृदयांतल्या विजांना झिडकारता न आले!

केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,
जगणे अखरे माझे मज टाळता न आले!

कवी : सुरेश भट


स्व-कीव करत बसण्याची सवय अनिष्ट आहे
जाणुनी हे मनःशांती राखणे प्राज्ञ आहे

सर एक श्रावणाची येते … निघून जाते…
निसर्गक्रम तो आहे हे जाणणे इष्ट आहे

घालसी कशास आपणा कोडे किंवा उखाणा
नसे करण्यामधे तसे उदात्त मोठेपणा

म्हणसी देणे अपुले नाकारता न आले
होते देणे काही ही कल्पना चुकीची आहे

लपवलेस गीत नाही, प्रकाशिलेस ते तूवा
भासल्या स्वव्यथांना ज्यात गुंफिले तूवा

स्व-कीव करत बसण्याची सवय अनिष्ट आहे
स्वव्यथागीते प्रकाशण्याची प्रथा अनिष्ट आहे


No comments:

Post a Comment