Thursday, June 27, 2013



(२२२) त्या पैलतीरावर.............................................ह्या ऐलतीरावर






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.






त्या पैलतीरावर ह्या ऐलतीरावर



त्या पैलतीरावर मिळेल मजला थारा
सुहृदांची प्रेमळ सोबत आणि उबारा

इकडच्या तटावर झाले ध्वस्त निवारे
जळतात पावलांखाली क्रुद्ध निखारे
मी तळमळताही निर्विकार जन सारे
पण तिथे वाहतो प्रसन्न शीतल वारा!

ऐकली न येथे आपुलकीची बोली
बहरली न आशा मनात अंकुरलेली
सारखी विफलता व्यथा माझिया भाली
पलिकड हासतो जीवन-श्रेय-फुलोरा!

पलिकडे मनोमय स्वप्नांचा संसार!
पलिकडे सुगंधित गीतांचा झंकार!
संतप्त उरास्तव वत्सल अमृतधार
बहरला मळ्यांनी वैभवपूर्ण किनारा!

कवी : सुरेश भट


ह्या ऐलतीरावर मिळवतो मजला थारा
सुहृदांची प्रेमळ सोबत आणि अन्य उबारा

इकडच्या तटावर ध्वस्त की शांत निवारे
दृष्टिकोनावर ते असते अवलंबून सारे
घटना अभागी घडता काही झणी उघडतो दारे
आणि आत वाहतो मग शीतल वारा

सदा मी करतो आपुलकीची बोली
प्रतिध्वनी असती ऐकू येत भोवताली
व्यथा विफलतेच्या वृथा न करतो सकाळसायंकाळी
अवतीभवती असतो मी फुलवत श्रेय-फुलोरा

असे ऐसे जीवनाच्या माझ्या साधे सार
आणि ऐकतो गीतांचा मी कोमल झंकार
विधात्याची गमते मज ही वत्सल अमृतधार
जगो शांतपणे जीवन मानवसमाज सारा


1 comment:

  1. Habanero Pepper - Titsanium Rocks - TiNanium Rocks
    Habanero Pepper - Titsanium micro touch hair trimmer Rocks. This one is titanium wedding rings fruity, smoky, and titanium grey smoky galaxy watch 3 titanium like other Capsicum dental implants pepper-related fruit.

    ReplyDelete