Thursday, June 27, 2013



(२२३) डोळे हे जुल्मी गडे....................................कविताचौरिणी






खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.







डोळे हे जुल्मी गडे कविताचौरिणीची कवयित्रीला विनंती


डोळे हे जुल्मी गडे, रोखून मज पाहू नका
जादूगिरी त्यात पुरी, येथ उभे राहू नका

घालू कशी कशिदा मी, होती किती सांगू चुका
बोचे सुई फिरफिरुनी, वेळ सख्या जाय फुका

खळबळ किती होय मनी, हसतील मज सर्वजणी
येतील त्या संधी बघूनी, आग उगा लावू नका

कवी : भा. रा. तांबे

धाडसाची जरी आहे गडे, मम चोरी रोखू नको
जादूगिरी त्यात पुरी, रोखून मज पाहू नको

जुळवू कशी कविता मी, होती किती सांगू चुका
बोचती शब्द फिरफिरुनी, वेळ सखे जाय फुका

खळबळ किती होय मनी, जाणावया का तू न को?
येतील का खुप संधी अशा? आग उगा लावू नको

No comments:

Post a Comment