खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे जरूर तर पुन्हापुन्हा एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
धरिला वृथा छंद | धरिला मी आगळा छंद |
---|---|
धरिला वृथा छंद नव्हतेच जर फूल, कोठून मकरंद? जरि जीव हो श्रांत नाही तृषा शांत जलशून्य आभास शोधित मृग अंध झाले तुझे भास मी रोधिले श्वास माझीच मज आस घाली असा बंध पथ सर्व वैराण पायी नुरे त्राण माझेच घर आज झाले मला बंद कवी : मंगेश पाडगांवकर |
धरिला काव्यरचना छंद परि मार्गी होती मोठी धोंड! न जुळुन कवन होई जिवाचे बहुत दमन जलशून्य आभास शोधित मृग अंध झाले मधुन भास मी रोधिले श्वास न होई परि दीर्घश्वासरोधन शक्य, येई बंध! पथ सर्व वैराण पायी नुरे त्राण हाय, हृदय शेवटी झाले माझे बंद! *********************************** काय आश्चर्य! चमत्कार होई! हृदय लागे पुन्हा टुकटुकू नि विचार आला करू या हायकू शब्द मोजके झटपट कविता लोक देतिल सन्मान, मान्यता शब्दांशी चालू केली झटपट अन् केली पुष्कळ खटपट हाय, उमगे हायकू रूप अति खट मिरचीसारखे तिखट वदे ते हास्य करुन विकट "लावुन कशा घेशी ही कटकट “श्राद्ध कशा घेशी ते विकत “रच कविता अनुसरुन वाग्भट “पाडगांवकर - भट - बापट" मग जाणून परिस्थिती बिकट म्हटले करू या आपण लटपट करून पाहू शक्य ती लगट काव्यरचनेशी, जेवि बापट - भट जरी न होईल काव्य झटपट जोडत बसणे "ट"ला"ट" हे काम नसावे फार दुर्घट; बसलो अन् काव्य लिहिण्या झटपट घेउनी हाती कागद- झरणी हुकमी विषय तरुण - तरुणी प्रणयचेष्टा तयांच्या वारुणी तरुण - तरुणी जणु हरण - हरिणी विहरणे सोप्पे तयांच्या भावतरंगिणीं शृंगार - आनंद - करुणभावांची वर्णी लावून भरुया बरणीवर बरणी भार वाहुनी जरी वाकेल धरणी अधिक पृथु प्रपंच प्रभवे मन्मनी उघडू आपण प्रचंड गिरणी लावुनि तिस काव्योत्पादनकारणी पाहुन अपुली अचाट करणी रसिकजन पडतिल अपुल्या चरणी भरवतिल शोकसभा अपुल्या मरणी ज्यांमधे अपुली गाईल गाणी जनता होउन पार दिवाणी म्हणेल कवी हा होता हिरकणी आजुबाजुस ज्याच्या हीन फुटके मणी देवाची करणी, नारळात पाणी ! *********************************** तरुण - तरुणींच्या भावतरंगिणीं शब्दबुडबुडे हुकमी कुडबुडे जंत्री तयांची त्रोटक देतो - छंद, मंद, गंध, सुगंध, सबंध, संबंध, निशिगंध, कंद, कुंद, गेंद, गुंड, आनंद, नंद, फंद, वंद, अंध, बंध, धुंद, मकरंद, बंद, चांद, चंद्र, इंद्र, गोंद, नोंद, हिंद, अरविंद, वांड, बंड, बेंड, धिंड ; आणि हवेतच भरीला प्राण, मन, बीन, जीवन, नवीन, मंथन, वंदन, चिंतन, चिरंतन, श्वास, निःश्वास, अश्रू, हास, हृदय, प्रेम, प्रीती, भीती, वात, वसंत, स्मित, सस्मित, रीत, रात, पहाट, प्रभात, कमल, कोमल, काल, ताल, नाद, सूर, हरित, दुरित, गीत, संगीत, हार, जीत, अंग, देह, बाहू, स्पर्श, लाज, लज्जा, कज्जा, मज्जा, भुरभुर, थरथर, झिरझिर, झिरमिर, निळाई, नभ, गगन, अंबर, श्रावण, पाऊस, धारा, गारा, संध्या, संभ्रम, विभ्रम, वारा, समिंदर, सागर, ... अथांग तत्सम थांबवितो ही जंत्री अता मम |
No comments:
Post a Comment