Saturday, June 29, 2013



प्रास्ताविक आणि अनुक्रमणिका


प्रास्ताविक


केशवसुत कवींची "आम्ही कोण" ह्या शीर्षकाची एक प्रसिद्ध कविता १९०२ साली "मनोरंजन" मासिकात छापून आली होती. सगळ्या कविवर्गाचे साभिमान स्तवन केशवसुतांनी त्या कवितेत केले होते. त्यानंतर वीस वर्षांनी प्र. के. अत्रेंनी "केशवकुमार" ह्या टोपणनावाखाली त्याच शीर्षकाची एक कविता प्रसिद्ध केली होती.

प्र. के. अत्रे ह्यांच्या एका विशिष्ट तर्‍हेच्या काव्यरचना करण्यातल्या कौशल्याबाबत खूप कौतुक बाळगणार्‍या मी त्या दोन्ही कविता खाली अनुक्रमणिकेच्या तळाशी उद्धृत केल्या आहेत.



===========================================================================



अनुक्रमणिका


कवितांचा क्रम अर्थात "टाइमस्टॅंप्स्‌"नुसार "मागून पुढे" आहे. म्हणजे उदाहरणार्थ, अनुक्रमणिकेतली #००१ क्रमांकाची कविता ह्या वेब्‌साइट्‌च्या अगदी शेवटच्या पानावर आढळेल.

खालच्या अनुक्रमणिकेत कवी/कवयित्रींच्या नावावर किंवा कवितेच्या शीर्षकावर "क्लिक्‌" केले असता त्या कवितेचे पान लगेच पहाता येईल.


# कवी/कवयित्री कवितेचे शीर्षक
.
००१ सुरेश भट फुटका पेला
००२ ग. दि. माडगूळकर राजहंस गातो
००३ ग. दि. माडगूळकर त्या तिथे, पलिकडे
००४ मंगेश पाडगांवकर असा बेभान हा वारा
००५ सुधीर मोघे एक झोका
००६ सुरेश भट थेंब
००७गुरू ठाकूर परी म्हणू की सुंदरा
००८ यशवंत देव स्वर आले दुरुनी
००९ सुधीर मोघे फिरुनी नवी जन्मेन मी
०१० मंगेश पाडगांवकर तुझे गीत गाण्यासाठी
०११ जगदीश खेबुडकर ज्वानीच्या आगीची मशाल हाती
०१२ जगदीश खेबुडकर का हासला किनारा
०१३ अनिल केळीचे सुकले बाग
०१४ शांताराम नांदगावकर तळव्यावर मेंदीचा
०१५ शांता शेळके अखेरचा हा तुला दंडवत
०१६ नारायण सुर्वे क्षितीज रुंद होत आहे
०१७ शांता शेळके जिवलगा, राहिले रे दूर
०१८ शांता शेळके काटा रुते कुणाला
०१९ सुरेश भट दुभंगून जाता जाता
०२० कौस्तुभ सावरकर धुंद होते शब्द सारे
०२१ कुसुमाग्रज काही बोलायाचे आहे
०२२ वंदना विटणकर शोधिसी मानवा
०२३ कुसुमाग्रज माझ्या मातीचे गायन
०२४ गुरू ठाकूर चैत पुनवेची रात
०२५ सुरेश भट मलमली तारुण्य माझे
०२६ सुरेश भट पहाटे पहाटे
०२७ शांताराम नांदगावकर सजल नयन नित
०२८ शांता शेळके रेशमाच्या रेघांनी
०२९ वा. रा. कांत बगळ्यांची माळ
०३० सुधीर मोघे विसरू नको श्रीरामा मला
०३१ मंगेश पाडगांवकर दिवस तुझे हे फुलायचे
०३२ सुरेश भट गंजल्या ओठास माझ्या
०३३ मंगेश पाडगांवकर तुमचं काय गेलं
०३४ मंगेश पाडगांवकर कुठे शोधिसी रामेश्वर
०३५ मंगेश पाडगांवकर जेव्हा तुझ्या बटांना
०३६ सुरेश भट वय निघून गेले
०३७ संत नामदेव काळ देहासी आला खाऊ
०३८ प्रसन्न शेंबेकर मी व्यथांना
०३९ ग. दि. माडगूळकर विठ्ठला, तू वेडा कुंभार
०४० अनिल अजुनी रुसून आहे
०४१ विंदा करंदीकर तेच ते
०४२ ग. दि. माडगूळकर आज कुणीतरी यावे
०४३ शांता शेळके जाईन विचारित रानफुला
०४४ मंगेश पाडगांवकर मी तिला विचारलं
०४५ मंगेश पाडगांवकर शब्दांवाचुन कळले सारे
०४६ मधुसूदन कालेलकर सांग कधी कळणार तुला
०४७ कुसुमाग्रज नाते
०४८ सुधीर मोघे सांज ये गोकुळी
०४९ मंगेश पाडगांवकर सांग सांग, भोलानाथ
०५० शांता शेळके घन रानी, साजणा
०५१ सुरेश भट यार हो
०५२ आरती प्रभू समईच्या शुभ्र कळ्या
०५३ शंकर रामाणी रंध्रात पेरिली मी
०५४ कुसुमाग्रज अखेर कमाई
०५५ पुरुषोत्तम दारव्हेकर तेजोनिधी लोह गोल
०५६ म. पा. भावे स्वप्नातल्या कळयांनो
०५७ विंदा करंदीकर उत्क्रांती
०५८ विंदा करंदीकर साठीचा गझल
०५९ विंदा करंदीकर हीच दैना
०६० ना. धों. महानोर अवेळीच केव्हा दाटला अंधार
०६१ आरती प्रभू ये रे घना, ये रे घना
०६२ अण्णासाहेब किर्लोस्कर वद जाऊ कुणाला शरण?
०६३ सुधीर मोघे फिटे अंधाराचे जाळे
०६४ अनिल वाटेवर काटे वेचीत चाललो
०६५ वसंत कानेटकर देवाघरचे ज्ञात कुणाला
०६६ कुसुमाग्रज हे सुरांनो, चंद्र व्हा
०६७ सुरेश भट तनमन अमृत बनते ग
०६८ आरती प्रभू कुणाच्या खांद्यावर
०६९ ग्रेस तुला पाहिले मी
०७० सौमित्र माझिया मना
०७१ ना. घ. देशपांडे अंतरीच्या गूढगर्भी
०७२ वसंत बापट शिंग फुंकिले रणी
०७३ वसंत बापट बाभुळझाड
०७४ जगदीश खेबुडकर धुंद एकांत हा
०७५ वामनराव जोशी दिव्य स्वातंत्र्य रवि आत्मतेजोबले
०७६ भवानीशंकर पंडित वेगवेगळी फुले उमलली
०७७ शांता शेळके अजब सोहळा
०७८ ग. दि. माडगूळकर अय्या बाई, इश्श बाई
०७९ सुरेश भट आज गोकुळात रंग खेळतो हरी
०८० वंदना विटणकर आई, मला पावसांत जाउं दे
०८१ वंदना विटणकर नाते जुळले मनाशी मनाचे
०८२ शांता शेळके आई, बघ ना कसा हा दादा
०८३ पी. सावळाराम आली हासत पहिली रात
०८४ रमेश अणावकर हिरव्या हिरव्या रंगाची
०८५ सौमित्र दिस चार झाले मन
०८६ वसंत बापट येशिल, येशिल, येशिल
०८७ सुधीर मोघे अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत
०८८ विद्याधर गोखले अपार हा भवसागर दुस्तर
०८९ मा. ग. पातकर दोन ध्रुवांवर दोघे आपण
०९० यशवंत देव कोटी कोटी रुपे तुझी
०९१ अशोक पत्की तू सप्तसूर माझे
०९२ सौमित्र कधी सांजवेळी
०९३ सुरेश भट चांदण्यात फिरताना
०९४ प्रवीण दवणे चांदण्यात झुलतो बाई
०९५ ग्रेस वार्‍याने हलते रान
०९६ बालकवी गाणार्‍या पक्ष्यास
०९७ शांता शेळके पावसाच्या धारा
०९८ सुरेश भट उजाडल्यावरी सख्या
०९९ सुरेश भट मग माझा जीव तुझ्या
१०० अनिल श्रावणझड
१०१ विंदा करंदीकर उंट
१०२ सुधीर मोघे गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
१०३ पी.सावळाराम हृदयी जागा
१०४ बा. भ. बोरकर दिव्यत्वाची जेथ प्रचिती
१०५ अशोक पत्की राधा ही बावरी
१०६ शांता शेळके जे वेड मजला लागले
१०७ ग. दि. माडगूळकर लपविलास तू हिरवा चाफा
१०८ ग्रेस पाऊस कधीचा पडतो
१०९ ग्रेस भय इथले संपत नाही
११० ग्रेस मरण
१११ ग्रेस घर थकले संन्यासी
११२ जगदीश खेबूडकर तुम्हांवर केलि मी मर्जि बहाल
११३ ग. दि. माडगूळकर बुगडि माझी सांडली ग
११४ इंदिरा संत बाभळी
११५ वसंत बापट उत्तुंग आमुची उत्तर सीमा
११६ वसंत बापट शतकानंतर आज पाहिली
११७ वसंत बापट सैनिकाप्रत
११८ बा. सी. मर्ढेकर झोपली ग खुळी बाळे
११९ संत ज्ञानेश्वर रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा
१२० मिलिंद फणसे कुजबुज
१२१ कुसुमाग्रज नवलाख तळपती दीप विजेचे येथ
१२२ मनीष हातवळणे तिचा रुमाल
१२३ सुधीर मोघे रात्रीस खेळ चाले
१२४ संजीवनी मराठे जायचे असेल जरी
१२५ मंगेश पाडगांवकर जपून चाल, पोरि, जपून चाल
१२६ ग. दि. माडगूळकर जिवलगा, येउ कशी रे आत
१२७ ग. दि. माडगूळकर माझा होशिल का?
१२८ विंदा करंदीकर अर्धीच रात्र वेडी
१२९ कुसुमाग्रज अनाम वीरास
१३० वसंत कानेटकर अर्थशून्य भासे
१३१ इंदिरा संत अजून नाही जागी राधा
१३२ शांताराम नांदगावकर अनुराग
१३३ मधुसूदन कालेलकर अजून आठवे
१३४ शंकर वैद्य आज हृदय मम विशाल झाले
१३५ कुसुमाग्रज स्वातंत्र्यदेवीची विनवणी
१३६ विंदा करंदीकर स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
१३७ संजीव अत्तराचा फाया
१३८ अनंत काणेकर आता कशाला उद्याची बात?
१३९ श्रीनिवास खारकर अग पाटलाच्या पोरी
१४० आरती प्रभू
दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही
१४१ मंगेश पाडगांवकर
तरीसुध्दा
१४२ संदीप खरे
अताशा
१४३ बा.सी.मर्ढेकर
सकाळी उठोनी
१४४ ग. दि. माडगूळकर
आला वसंत देही
१४५ अनिल
धुआरी
१४६ अनिल
उद्या उद्या तुझ्यामध्येच
१४७ सुधीर मोघे
आला आला वारा
१४८ आरती प्रभू
तू तेव्हा तशी
१४९ सुरेश भट
दूर दूर चांदण्यात
१५० जगदीश खेबुडकर
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
१५१ आरती प्रभू
ती येते आणिक जाते
१५२ पु.ल.देशपांडे
बगळा
१५३ पु.शि. रेगे
त्रिधा राधा
१५४ प्रल्हाद केशव अत्रे
उगवला चंद्र पुनवेचा
१५५ सुरेश भट
उषःकाल होता होता
१५६ गंगाधर महांबरे
कंठातच रुतल्या ताना
१५७ अनिल
कुणि जाल का, सांगाल का
१५८ राजा मंगळवेढेकर
कोणास ठाऊक कसा
१५९ सुधीर मोघे
काजल रातीनं ओढून नेला
१६० सुरेश भट
केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली
१६१ जगदीश खेबुडकर
दहा दिशांनी दहा मुखांनी
१६२ मनमोहन नातू
लाला कोणासाठी
१६३ इंदिरा संत
बाधा जडली आभाळाला
१६४ मंगेश पाडगांवकर
तात्पर्य
१६५ इंदिरा संत
एक सवय
१६६ विंदा करंदीकर
जगण्यामध्ये ब्रह्मानंद
१६७ इंदिरा संत
माझी प्रीत
१६८ बा. भ. बोरकर
निळा
१६९ इंदिरा संत
निळेसावळे
१७० अनिल
एक दिवस
१७१ अरुण कोलटकर
तक्ता
१७२ विंदा करंदीकर
मला टोचते मातीचे यश
१७३ बा. भ. बोरकर
रूपकळा
१७४ बा. सी. मर्ढेकर
किती पायी लागू तुझ्या
१७५ अरुण म्हात्रे
ते दिवस आता कुठे
१७६ ग्रेस
अंधार असा घनभारी
१७७ आरती प्रभू
जाईन दूर गावा
१७८ वासंती मुझुमदार
कुणा काही देता देता
१७९ विंदा करंदीकर
असेल जेव्हा फुलावयाचे
१८० म. म. देशपांडे
अंतरिक्ष फिरलो पण
१८१ विंदा करंदीकर
वेड्याचे प्रेमगीत
१८२ अनुराधा पाटील
आपणच आपल्याला
१८३ शांता शेळके
मैत्रीण
१८४ संजीवनी मराठे
झोका
१८५ अनिल
तळ्याकाठी
१८६ द.भा.धामणस्कर
अनंताचे फूल
१८७ बा. सी. मर्ढेकर
ह्या दु:खाच्या कढईची गा
१८८ कुसुमाग्रज
मातीची दर्पोक्ती
१८९ मंगेश पाडगांवकर
शुक्रतारा, मंद वारा
१९० वसंत बापट
ये उदयाला नवी पिढी
१९१ सुरेश भट
आता असे करू या!
१९२ ग. दि. माडगूळकर
एका वटवृक्षाखाली
१९३ विंदा करंदीकर
सोपेच असतात तुझे केस
१९४ विंदा करंदीकर
डोळ्यातल्या डोहामध्ये
१९५ विंदा करंदीकर
तुकोबाच्या भेटी शेक्स्पीअर आला
१९६ विंदा करंदीकर
तरुणपणी
१९७ विंदा करंदीकर
तसेच घुमते शुभ्र कबूतर
१९८ विंदा करंदीकर
तीर्थाटन
१९९ बा.सी.मर्ढेकर
अस्थाई
२०० बा.सी.मर्ढेकर
पिपात मेले ओल्या उंदिर
२०१ प्र. के. अत्रे
श्यामले
२०२ बा.सी.मर्ढेकर
जशि धोब्याची मऊ इस्तरी
२०३ बा.सी.मर्ढेकर
आला आषाढ-श्रावण
२०४ बा.सी.मर्ढेकर
गणपत वाणी
२०५ बा.सी.मर्ढेकर
दवात आलीस भल्या पहाटी
२०६ गोविंदाग्रज
नट मित्रास पत्र
२०७ माधव ज्यूलियन
मराठी असे आमुची मायबोली
२०८ कृष्णशास्त्री चिपळूणकर
शुकान्योक्ती
२०९ ना. घ. देशपांडे
असाच
२१० कुसुमाग्रज
कोलंबसाचे गर्वगीत
२११ नारायण गोविंद शुक्ल लाला टांगेवाला
२१२ वा. रा. कांत
श्रावण
२१३ शांता शेळके
बघ आई आकाशात सूर्य हा आला
२१४ अ.ज्ञा. पुराणिक पतंग उडवू चला
२१५ विद्याधर सीताराम करंदीकर घननीळ
२१६ सुरेश भट
हेही असेच होते
२१७ सुरेश भट हासताना प्राण गेला
२१८ सुरेश भट अद्यापही सुर्‍याला माझा सराव नाही
२१९ सुरेश भट
हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी
२२० मंगेश पाडगांवकर संथ निळे हे पाणी
२२१ सुरेश भट
समजावुनी व्यथेला समजावता न आले
२२२ सुरेश भट
त्या पैलतीरावर
२२३ भा. रा. तांबे
डोळे हे जुल्मी गडे
२२४ मंगेश पाडगांवकर
आपलं गाणं
२२५ मंगेश पाडगांवकर
धरिला वृथा छंद



===========================================================================




तुमच्या कंप्युटरवर डावीकडच्या आणि उजवीकडच्या कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~



आम्ही कोण आम्ही कोण


आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया -
सौंदर्यातीशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!

शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनीया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!

आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!

कवी : केशवसुत



’आम्ही कोण?’ म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी?
’फोटो’ मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला?
किंवा ’गुच्छ’ ’तरंग’ ’अंजली’ कसा अद्यापि ना वाचिला?
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी?

ते आम्ही- परवाङ्मयातिल करूं चोरून भाषांतरे,
ते आम्ही- न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी!
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी!
त्याचे वाग्धन वापरून लपवूं ही आमुची लक्तरे!

काव्याची भरगच्च घेऊनि सदा काखोटिला पोतडी,
दावूं गाउनि आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे,
दोस्तांचे घट बैसवून करुं या आम्ही तयांचा ’उदे’!
दुष्मानांवर एकजात तुटुनी की लोंबवू चामडीं!

आम्हाला वगळा- गतप्रभ झणीं होतील साप्ताहिके!
आम्हाला वगळा- खलास सगळी होतील ना मासिके!

कवी : प्र. के. अत्रे (केशवकुमार)

1 comment:

  1. अभिनव उपक्रम! हार्दीक अभिनंदन!
    केशवसुतांची "आम्ही कोण" व तिचे अत्र्यांचे विडंबन मलाही "भयंकर" आवडते. पण ते तुमच्या अनुक्रमणिकेत मला तरी सापडत नाही. कृपया उलगडा व्हावा ही विनंती. सुवर्णकालीन, मावळत्या, मराठीचा एक चाहता, व आपला प्रशंसक,
    - डॉ. क्रांती तोरस्कर,होंग कोंग (चीन)

    ReplyDelete