Thursday, June 30, 2011

(१६७) माझी प्रीत....................................आणि माझे गीत

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

माझी प्रीत आणि माझे गीत

सुकुमार माझी प्रीत
रानातल्या फुलवाणी;
नको पाहू तिच्याकडे
रागेजल्या नयनांनी.

लाजरी ही माझी प्रीत
लाजाळूच्या रोपाहुन;
नको पाहू वाट तिची :
तूच घेई ओळखून.

मुग्ध मूक प्रीत माझी :
निर्झराची झुळझुळ;
नको पाहू उलगून
अस्फुटसे तिचे बोल.

अल्ल्लडशी प्रीत माझी :
सर तिला पाखराची;
तुझ्या मनी आढळली
जागा तिला निवा-याची.

कवयित्री : इंदिरा संत

सुरेखसे माझे गीत
कानातल्या कुड्यांवाणी;
नको ऐकू ते रे तुझ्या
झाकल्या दोन्ही कानांनी.

झोपाळू हे माझे गीत
मरगळले पेंगून;
नको पाहू अंत त्याचा :
तूच घेई ते ओळखून.

नवे मूक आता गीत
सा्रे कसे शांत शांत
नको जाऊ गोंधळून :
“गेले कुठे हिचे बोल?”

अर्थापल्याडचे गीत माझे :
सर त्याला कवीश्रेष्ठांची;
माझ्या मनी आढळली
जागा त्याला निवा-याची.

(१६६) जगण्यामध्ये ब्रह्मानंद...................दुर्गम काव्यरचनांमध्ये ब्रह्मानंद

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

जगण्यामध्ये ब्रह्मानंद दुर्गम काव्यरचनांमध्ये ब्रह्मानंद

बरगड्यांच्या तुरुंगातून
मी हृदयाला मुक्त केले;
जिथे जिथे धमनी आहे
तिथे माझे रक्त गेले.

दिक्कालाच्या जबड्यामधील
लवलवणारी जीभ मी;
आसक्तीच्या गर्भामधील
धगधगणारे बीज मी.

माझ्या हातात महायंत्र;
माझ्या मुखात महामंत्र.

सगळे मिळून सगळ्यांसाठी
मरण्यातही मौज आहे;
सगळे मिळून सगळ्यांसाठी
जगण्यामध्ये ब्रह्मानंद.

कवी : विंदा करंदीकर

शब्दकोशांच्या तुरुंगातून
मी शब्दांना मुक्त केले;
जिथे जिथे शक्य आहे
तिथे माझे काव्य गेले.

दिक्कालाच्या जबड्यामधील
लवलवणारी जीभ मी;
आसक्तीच्या गर्भामधील
धगधगणारे बीज मी.

झरणीचे माझ्या हातात महायंत्र;
त्यातून जे काय बाहेर पडेल
त्या काव्याला असेल-नसेल ताळतंत्र.

शब्द जुळवून सगळ्यांसाठी
सुगम गीते लिहिण्यात मौज आहे;
शब्द जुळवून मुक्तछंदात
दुर्गम गीते लिहिण्यात ब्रह्मानंद.

Wednesday, June 29, 2011

(१६५) एक सवय........................................एक सवय

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

एक सवय एक सवय

इसापनीतीतील ’इ’ गिरवायला घेतली
तेव्हापासून जडलेली, अजूनही न सुटलेली
ही सवय
तात्पर्य काढण्याची. तात्पर्य
आलेल्या कडूगोड अनुभवांचे.
सुखदु:खाच्या प्रसंगांचे.
चालण्याचे. बोलण्याचे. वागण्याचे.
आपले. दुसऱ्याचे. सर्वांचे.
तात्पर्य.

वाटले होते या तात्पर्यांच्या दणकट
खुंट्या रोवून सहज सहज चढावा
हा संसारगड : हा बिकट उभा चढ
श्रेयाकडे पोचणारा.

पण कुठले काय?
ही तात्पर्ये म्हणजे अगदी मऊसूत
लवचिक.
बसल्या बसल्या वळून लोंबत सोडलेल्या
शेवयांसारखी. सुखासीन.

आजपर्यंतच्या या तात्पर्यांच्या
घनदाट झिरमिळ पडद्यामधे उभी असलेली
मी. एकदा वाटते,
कोण ही कैद!
एकदा वाटते, किती मी सुरक्षित!

कवयित्री : इंदिरा संत

इसाप नीतीतील ’इ’ गिरवायला घेतली
तेव्हापासून जडलेली, अजूनही न सुटलेली
ही सवय
खोड्या काढण्याची. खोड्या
बहीणभावंडांच्या.
सवंगड्यांच्या.
चालताना. बोलताना. वागताना.
नवीननवीन. दुसर्‍यांच्या. सर्वांच्या.
खोड्या.

वाटले होते या खोड्यांच्या दणकट
खुंट्या रोवून सहज सहज चढावा
हा संसारगड : जरी त्याचा उभा चढ
आकाशाकडे पोचणारा.

पण सांगते काय?
या खोड्या केल्या अगदी मऊसूत
शेवयांसारख्या.
बसल्या बसल्या रचलेल्या
गंमतिकांसारख्या. मजेशीर.

आजपर्यंतच्या या खोड्यांच्या
चिकाच्या झिरमिळ पडद्यामधे उभी असलेली
मी. एकदा वाटते
मी आहे एक लहान मुलगी.
एकदा वाटते, मी आहे गार्गी किंवा मैत्रेयी!

Tuesday, June 28, 2011

(१६४) तात्पर्य (१)................................विचारवंत
******तात्पर्य (२)................................वारुणी

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

तात्पर्य विचारवंत

द्यायचं नाही असं जरी ठरवलंस,
तरी तू घ्यायचं नाहीस
असा त्याचा अर्थ होतो
म्हणून कुणी सांगितलं?

अदृश्य हात दान देणार्‍या देवाचा
झाडाला न कळत आतून आतून रसवतो
आणि मग फांद्यांची फुलं होतात.

सांगायचं तात्पर्य इतकंच की
तू आधी नकळत फुलून घे;
द्यायचं - घ्यायचं काय
ते आपण नंतर पाहू.

कवी : मंगेश पाडगांवकर

घ्यायचं नाही असं जरी मी ठरवलं
तरी मी घेणार नाही
असा त्याचा अर्थ होतो
म्हणून कुणी सांगितलं?

ठरवणं आणि त्याप्रमाणे माणसाने
करणं न करणं
ह्या दोन गोष्टी अगदी वेगळ्या आहेत
हे काय सांगायला पाहिजे?

अर्थात्‌ तसं मी कशाला ठरवणार?
“जे मिळेल मोफत ते सूज्ञजन स्वीकारत”
असे कोणी विचारवंताने (मी)
म्हणून ठेवलेच आहे.

तात्पर्य वारुणी

द्यायचं नाही असं जरी ठरवलंस,
तरी तू घ्यायचं नाहीस
असा त्याचा अर्थ होतो
म्हणून कुणी सांगितलं?

अदृश्य हात दान देणार्‍या देवाचा
झाडाला न कळत आतून आतून रसवतो
आणि मग फांद्यांची फुलं होतात.

सांगायचं तात्पर्य इतकंच की
तू आधी नकळत फुलून घे;
द्यायचं - घ्यायचं काय
ते आपण नंतर पाहू.

कवी : मंगेश पाडगांवकर

प्यायचं नाही असं जरी मी ठरवलं
तरी मी "पिणार" नाही
असा त्याचा अर्थ होतो
म्हणून कुणी सांगितलं?

अदृश्य हात पिणार्‍या माणसाचा
पेला त्याच्या नकळत भरत रहातो
आणि मग ते पेय त्याच्या पोटात जात रहाते

सांगायचं तात्पर्य इतकंच की
तू "पेया"पासून दूर रहाण्यात
शहाणपणा आहे.
.

(१६३) बाधा जडली आभाळाला...................कवयित्रीची दुरवस्था

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

बाधा जडली आभाळाला कवयित्रीची दुरवस्था

बाधा जडली आभाळाला.
घुमू लागले
घुमवित घुमवित लाख घागरी;
बघू लागले वाकुन वाकुन
गवतावरच्या थेंबामध्ये;
फरफटलेही
उलटेसुलटे जळलहरींच्या मागुन;
टिपू लागले
ओठ लावुनी मातीचे कण.

आवरु बघते त्याला
दोन करांनी बांधुन,
आवरु बघते त्याला
डोळ्यांमध्ये कोंडुन.

व्यर्थच ते पण...
जाते निसटून
काजळावरी गढूळ ठेवुन छाया,
मुठीत ठेवुन फक्त निळी धग.

कवयित्री : इंदिरा संत

बाधा जडली ह्या कवयित्रीला
घुमू लागले
घुमवित घुमवित लाख घागरी;
बघू लागले वाकुन वाकुन
गवतावरच्या थेंबामध्ये;
फरफटलेही
उलटीसुलटी काव्यलहरींच्या मागुन;
टिपू लागले
ओठ लावुनी शब्दांचे कण.

आवरु बघते माझ्या स्फुरणाला
शब्दांच्या रज्जूंनी बांधुन,
आवरु बघते त्याला
तालामध्ये कोंडुन.

व्यर्थच ते पण...
गेले निसटून
स्फुरण, अन्‌ त्यामागून कवन,
हाती राही फक्त निराश झरणी.

(१६२) लाला कोणासाठी..........................पैशांच्या राशीसाठी

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

लाला कोणासाठी पैशांच्या राशीसाठी

विश्वाशी मी वैर धरिले,
कान्हा कोणासाठी रे
दुनियेशी मी दावा धरिला,
लाला कोणासाठी रे

जहरी लहरी कालिया
भुलविल तुजला भूलभुलैय्या
नको साहसे करूस सैंय्या,
चिंध्यांच्या चेंडूसाठी

भावाशी भांडले
ताईशी तणतणले
वडिलांना वंचिले
पान्हा पाजणार्‍या आईशी मी झाले उफराटी

माझे बाई माहेर भरले
चांदीच्या घराला
सोन्याची कौले
राजकुमारी धावले मी गवळ्याच्या पोरासाठी

नको बिंदी मोतियाची
नको सरी सोनियाची
नको चमकी माणिकाची
दसलाखी तव हातांचा रे हार माझ्या कंठी

कवी : मनमोहन नातू

विश्वाशी तू वैर धरिले,
चाचा कोणासाठी रे
दुनियेशी तू दावा धरिला,
लाला कोणासाठी रे

जहरी लहरी कालिया
भुलविल तुजला भूलभुलैय्या
नको साहसे करूस सैंय्या,
चिंध्यांच्या चेंडूसाठी

गावाशी भांडलास
वेशीशी तणतणलास
गणगोतां वंचिलास
मदिरा पाजणार्‍या बाईशीही झालास उफराटी

तुझे भैय्या तळघर भरले
चांदीच्या थैल्यांनी
सोन्याच्या विटांनी
कमनशिब्या, धावलास तू पैशांच्या राशीपाठी

एक राशी मोतियांची
दुसरी राशी असे पाचूंची
तिसरी राशी माणिकांची
शतकोटी रुपयांचा असे रे गळफास तुझ्या कंठी

(१६१) दहा दिशांनी दहा मुखांनी...................रंकाचा राव कैसा जाहला

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

दहा दिशांनी दहा मुखांनी आहे किस्सा हा,
रंकाचा राव कैसा जाहला

दहा दिशांनी दहा मुखांनी आज फोडिला टाहो
आसवांत या भिजली गाथा, श्रोते, ऐका हो!
माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

गंगेवाणी निर्मळ होतं असं एक गाव
सुखी समाधानी होतं रंक आणि राव
त्याची गुणगौरवानं किर्ती वाढली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला , कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्ट लागली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला नदीपार केली
नार सूड भावनेनं उभी पेटली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

पिसाळलेल्या नागिणीने थयथयाट केला
नाचगाण्यासाठी सारा गाव येडा झाला
त्यांनी लाज भीड नीती सारी सोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

जाब विचाराया गेला तिनं केला डाव
भोवर्‍यात शृंगाराच्या सापडली नाव
त्याच्या पतंगाची दोरी तिनं तोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

खुळ्या जीवा कळला नाही खोटा तिचा खेळ
तपोभंग झाला त्याचा पुरा जाई तोल
त्याला कुत्र्या-मांजराची दशा आळली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

जन्मभरी फसगत झाली, तिचा हा तमाशा
जळूनिया गेली आता, जगायची आशा
आज हुंदक्यानं भैरवी मी गाईली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

याची देही याची डोळा पाहिले मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले सरण
माझ्या कर्म सोहळ्याची यात्रा चालली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली!

कवी : जगदीश खेबुडकर
चित्रपट : पिंजरा (१९७७)

दहा दिशांनी दहा मुखांनी आज भाषण करतो
नीट ऐका, श्रोत्यांनो, जे आहे मी सांगतो
आहे किस्सा हा, रंकाचा राव कैसा जाहला
कैसा आहे नशीबाने खेळ छान मांडला!

गंगेवाणी निर्मळ होतं असं एक गाव
दिवस कसेतरी कंठत ज्यात होतो मी, राव.
माझा नव्हता ठावठिकाणा काही जगताला
पण मग नशीबाने खेळ छान मांडला!

माझ्या गावी आला एकदा एक कुणी संत
पुण्यवान म्हणती त्याला , कुणी म्हणे महंत
प्रवचनानंतर त्याच्या तो एकदा मला भेटला
कैसा आहे नशीबाने खेळ छान मांडला!

मला म्हणाला, “होशील तू राजकारणी
"लावशील तुझे आयुष्य बहुत तू सत्कारणी
"आशीर्वाद आहे माझा रावजी तुजला"
कैसा आहे नशीबाने खेळ छान मांडला!

लवून मस्तक नमस्कार मी त्या संताला केला
अन्‌ राजकारणात शिरण्याचा विचार माझा झाला
लाज भीड नीती ह्यांना मी रामराम ठोकला
कैसा आहे नशीबाने खेळ छान मांडला!

जाब विचाराया मला काही होती टाप कुणाची
गोळा केली माझ्याभावती सैना पित्त्यांची
टाच मारुनी राजकारणी दौरा माझा चालला
कैसा आहे नशीबाने खेळ छान मांडला!

खुळ्या जनतेला नाही कळला माझा धूर्त खेळ
लंबी लंबी आश्वासने देणे आहे पोरखेळ
निवडणुकीत एका माझा विजय सहज झाला
कैसा आहे नशीबाने खेळ छान मांडला!

जन्मभर चालणार आता राजकारणाचा तमाशा
लवकरच होईन मुख्यमंत्री अशी मम महत्त्वाकांक्षा
आज आहे मीच माझा पोवाडा गायला
कैसा आहे नशीबाने खेळ छान मांडला!

याच देहाचे आहे करते जनतासंमर्द पूजन
त्या पूजनाने सदा मिळते मला बहुत स्फुरण
माझ्या सोहळ्याचा आहे अविरत रथ चालला
कैसा आहे नशीबाने खेळ छान मांडला!

(१६०) केव्हा तरी पहाटे........................एका गुन्हेगाराची कैफियत

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

केव्हा तरी पहाटे एका गुन्हेगाराची कैफियत

केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली!

उरले उरात काही आवाज चांदण्याचे
आकाश तारकांचे, उचलून रात्र गेली!

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली!

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?

कवी : सुरेश भट
चित्रपट : निवडुंग (१९८९)

केव्हा तरी पहाटे सुमारे चारच्या वेळी
मिटले चुकून डोळे , ओलीस पळून गेली

कळले मला न केव्हा लागली डुलकी जराशी
कळले मला न केव्हा निसटून मुलगी गेली

सांगू कसे कुणा मी ते निरवधान माझे
पाहून डोळे मिटले मुलगी पसार झाली

ऐकू न आले काही आवाज निसटण्याचे
गगनी जणू परीने उचलून तिजला नेले

स्फुरल्या लगेच मजला ह्या चार गीतपंक्ती
निसटुन जाय सावज, उरल्या त्या माझ्या संगती

आता कुशीत घेऊन ह्या चार गीतपंक्ती
अश्रुपूर्ण नयने नशीबा मी बोल लावी

अजुनी सुगंध येतो खोलीत मोगऱ्याचा
गजरा केसात होता, मुलगी पसार झाली!

(१५९) काजल रातीनं ओढून नेला.........................पाणीपुरवठा

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

काजल रातीनं ओढून नेला पाणीपुरवठा

काजल रातीनं ओढून नेला
सये साजन माझा
जीव ये भरुनी भिजते पापनी
कधि रे येशिल राजा

पाऊस येडापिसा
जिवाला लावून गेला तात
तुफान आलं सुसाट
माजा करुन गेला घात
कातरवेळी करनी जाली
हरवून गेला राजा

सुकली फुलांची शेज राया
राहिला अर्धा डाव
उधळून जाता खेळ वाया
श्वासांनी तोडिला ठाव
भुकेली ज्वानी जळते आतुनी
ये रे ये एकदा राजा

कवी : सुधीर मोघे
चित्रपट : हा खेळ सावल्यांचा (१९७६)

मुन्शीपाल्टीनं पाणीपुरवठा
कमी क्येला आमचा
जिवा चिंता , भरिल कधी
हंडा माझा पाण्याचा

पाऊस मुसलधार
पडून गेला हुता काल
तुफान आलं सुसाटबी
हुतं त्यासंगं बेताल.
आता यिइल जास्त येळ -
पाणी असा इचार माझा

पाणी नाय काय नाय
हंडा अर्धा रिकामा
मुन्शीपाल्टीचा कारभार
जेरीस आणतो आम्हा.
विनविते परोपरी तुला
ये रे ये खंडुबाराजा

(१५८) कोणास ठाऊक कसा.........................वेडापिसा ससा

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

कोणास ठाऊक कसा वेडापिसा ससा

कोणास ठाऊक कसा
पण सिनेमात गेला ससा

सशाने हलवले कान
घेतली सुंदर तान
सा, नि, ध, प, म, ग, रे, सा
रे, ग, म, प
दिग्दशर्क म्हणाला,
व्वा व्वा!
ससा म्हणाला,
चहा हवा

कोणास ठाऊक कसा
पण सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी
भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला,
छान छान!
ससा म्हणाला,
काढ पान

कोणास ठाऊक कसा
पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे
बे एके बे, बे दुणे चार
बे त्रिक सहा, बे चोक आठ
आणि भरभर वाचले धडे
गुरुजी म्हणाले,
शाबास!
ससा म्हणाला,
करा पास

कवी : राजा मंगळवेढेकर

कोणास ठाऊक कसा
पण सिनेमात गेला ससा

सशाने हलवले कान
आणि अशी घेतली तान -
म ग रे, ध रे प सा
ध रे प सा
दिग्दशर्क म्हणाला,
मगर कशाला धरणार पसा?
ससा म्हणाला,
कारण तिचा धरला घसा

कोणास ठाऊक कसा
पण सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी
आणि खाली पडली शिडी
विदुषक म्हणाला,
शिडी पडली की खाली!
ससा म्हणाला,
शिडी कशी पडणार वरती?

कोणास ठाऊक कसा
पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे
बे एके बे, बेदाणे चार
बेकरीत सहा, बेचो काठ
आणि पुढे अडले गाडे
गुरुजी म्हणाले,
साफ चूक
ससा म्हणाला,
मला लागली आहे भूक!

(१५७) कुणि जाल का, सांगाल का.......................चिरंजीव

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

कुणि जाल का, सांगाल का चिरंजीवांची रात्रीच्या अवेळी
गाण्याची लहर

कुणि जाल का, सांगाल का,
सुचवाल का ह्या कोकिळा
रात्री तरी गाऊं नको
खुलवू नको अपुला गळा

आधीच संध्याकाळची
बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन
देत दारी थांबली

हार पूर्वीचा दिला तो
श्वास साहुन वाळला
आताच आभाळातला
काळोख मी कुरवाळला

सांभाळुनी माझ्या जिवाला
मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली
हलकी निजेची पावले

कळवाल का त्या कोकीळा,
की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी
रात्र जागुन काढली

कवी : अनिल

कुणि जाल का, सांगाल का.
“सुचवाल" का ह्या श्यामला
रात्री तरी गाऊं नको
श्रमवू नको अपुला गळा

आधीच दिवसाभराची
भ्रमंती आहे लांबली
कालगती भासतेय
जणू पूर्ण थांबली

दमलाभागला देह
बिछान्यावर झोकुनी दिला
दिवा मालवून खोलीतला
काळोख मी कुरवाळला

पांघरूण ओढुनी मी
शरीरा होते लपेटले
इतक्यात श्यामचे मुक्तकंठ
गान श्रवणी पडले!

कुणि जाल का, सांगाल का.
“सुचवाल" का ह्या श्यामला
म्हणावे रात्री तरी गाऊं नको
फुलवू नको अपुला गळा

(१५६) कंठातच रुतल्या ताना..............मैफल-आयोजकांची काहीतरी गफलत

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

कंठातच रुतल्या ताना मैफल-आयोजकांची
काहीतरी गफलत

कंठातच रुतल्या ताना
कुठे ग बाई कान्हा
कुणीतरी जा, जा, जा, जा,
घेउनि या मोहना

कदंब-फांद्यावरी बांधिला
पुष्पपल्लव-गंधित झोला
कसा झुलावा, परि हा निष्चल
कुंजविहारीविना

थांबे सळसळ जशि वृक्षांची
कुजबुज सरली झणि पक्ष्यांची
ओळखिचे स्वर कानि न येता
थबके ही यमुना

मुरलीधर तो नसता जवळी
सप्तस्वरांची मैफल कुठली?
रासक्रिडेची स्वप्ने विरली
एका कृष्णाविना

कवी : गंगाधर महांबरे

कंठातच रुतल्या ताना
कुठे असे श्रोतृगण , त्यांना
कुणीतरी जा, जा, जा, जा,
आणा विलंबाविना

मैफलीचा बेत बांधिला
नीट तनपुरा जुळवला
कसा करावा प्रारंभ परी
श्रोतृवृंदाविना

थांबे सळसळ वटवृक्षांची
कुजबुज सरली कोकिलपक्ष्यांची
ओळखिचे स्वर कानि न येता
थबके कुणी ललना

श्रोतृगण पण नसता जवळी
सप्तस्वरांची मैफल कुठली?
मैफलीची स्वप्ने विरली
एकाही श्रोत्याविना!

(१५५) उषःकाल होता होता..............एका मंत्र्याच्या एका पूर्वहस्तकाची कैफियत

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

उषःकाल होता होता एका मंत्र्याच्या एका पूर्वहस्तकाची कैफियत

उषःकाल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी!
अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुशाली!

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी?
ह्या अपार दु:खाचीही चालली दलाली!

उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे! “
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे!
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली!

कवी : सुरेश भट
चित्रपट : सिंहासन (१९७९)

उषःकाल होता होता काल रात्र झाली
वारुणीच्या प्याल्यांमध्ये शुद्ध नष्ट झाली

"आम्ही चार घासांचीही आस का धरावी
"जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?”
कृद्ध शब्दांची ऐशा ओठी भरती आली

“तेच डाव करिती फिरुनी हे नवे पुजारी
“तेच डाव उलटविती अम्हावरी ते विखारी
“कोण ऐकत असतो आमुची खुशाली?

“तिजोर्‍यात त्यांच्या असती पैसे कोटी
“असे अम्हा भ्रांत कुठुन मिळेल रोटी
“सांगा अमुची करेल कोण रखवाली

“अशा कशा घेतल्या तीन गाड्या तयांनी
“ असे कसे फिरतात जोडुनी हात दोन्ही
“ अन्‌ का असावी नशिबी आमच्या हमाली?

"उभा देश झाला आता एक बंदीशाला
"आत कैदी अम्ही, करती ते पहारा
“कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

“धुमसतात मनी ऐशा विचारांचे निखारे
“फुलवती त्यांना मधूनमधून वारे"
उषःकाल होता होता काल रात्र झाली

(१५४) उगवला चंद्र पुनवेचा................दरोडेखोरांच्या धाडीची खेड्यातली अफवा

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

उगवला चंद्र पुनवेचा दरोडेखोरांच्या धाडीची
खेड्यातली अफवा

उगवला चंद्र पुनवेचा
मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा

दाहि दिशा कशा खुलल्या
वनिवनी कुमुदिनी फुलल्या
नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गिचा

कवी : प्रल्हाद केशव अत्रे
नाटक : पाणिग्रहण (१९४६)

"उगवणार ते सांजचे”
जनहृदयी लोळ उसळले भीतीचे

दाहि दिशा वार्ता पसरल्या
तोंडातोंडी अफवा फुलल्या
मती सकलांच्या सुन्न जाहल्या
दणणाले धाबे ग्रामवासियांचे

(१५३) त्रिधा राधा.....................................त्रिविधा गंमतिका

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

त्रिधा राधा त्रिधा त्रेधा

आभाळ निळे तो हरि,
ती एक चांदणी राधा,
बावरी,
युगानुयुगीची मनबाधा

विस्तीर्ण भुई गोविंद,
क्षेत्र साळीचे राधा,
संसिद्ध,
युगानुयुगीची प्रियंवदा

जलवाहिनी निश्चल कृष्ण,
वन झुकले काठी राधा,
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरतंद्रा

कवी : पु.शि. रेगे

आभाळ फुटून पाऊसधारा
चटकचांदणी राधा
उघडे छत्री;
सुसाट वारा ; छत्री झाली उलटी.

विस्तीर्ण रस्ता
कडेने चालता राधा
घसरली
भुईशी गाठ पृष्ठभागाची.

जलाशयाच्या काठावर निश्चल कृष्ण,
जवळून चालता राधा
ढकले कृष्ण
तिला पाण्यात .

त्रिधा राधा विषबाधा

आभाळ निळे तो हरि,
ती एक चांदणी राधा,
बावरी,
युगानुयुगीची मनबाधा

विस्तीर्ण भुई गोविंद,
क्षेत्र साळीचे राधा,
संसिद्ध,
युगानुयुगीची प्रियंवदा

जलवाहिनी निश्चल कृष्ण,
वन झुकले काठी राधा,
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरतंद्रा

कवी : पु.शि. रेगे

आभाळ निळे त्रिप्रहरी
चालत होती एकटी वृद्धा
बिचारी,
चावला सर्प, झाली विषबाधा

विस्तीर्ण शेत हरित
होती मधुन चालली वृद्धा
संसिद्ध,
योगायोगाची अप्रियकथा

जलवाहिनी संथ काल
पान सुकले, काठी पडले
विप्रोषित
युगानुयुगीची चिरनिद्रा

त्रिधा राधा त्रिधा शिधा

आभाळ निळे तो हरि,
ती एक चांदणी राधा,
बावरी,
युगानुयुगीची मनबाधा

विस्तीर्ण भुई गोविंद,
क्षेत्र साळीचे राधा,
संसिद्ध,
युगानुयुगीची प्रियंवदा

जलवाहिनी निश्चल कृष्ण,
वन झुकले काठी राधा,
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरतंद्रा

कवी : पु.शि. रेगे

आभाळ निळे ते वरी
झाडाखाली अवनीवरी
बसला एक भुकेला
युगानुयुगीची शरीरबाधा

विस्तीर्ण भुई
जनसंख्या अब्ज सात
अर्ध्याहून अधिक भुकेली
नव्या युगाची बाधा

कालप्रवाह संथ
उभा प्रश्न महान
मिळणार का त्रिधा शिधा
सगळ्यांना ; कसा

Monday, June 27, 2011

(१५२) बगळा................................बगळा, कावळा, मासा, कोल्हा, माणूस

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

बगळा बगळा

निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे

निळ्या आकाशात
उडणारा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
तळ्याच्या काठावर
मनोहरपणे झेपावला.
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

बगळा आणि कावळा

निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे

निळ्या तळ्याच्या
काठावरचा कावळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
पांढर्‍या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या कावळ्याला
’हुडुत्‌’ म्हणालो होतो

बगळा आणि बगळी

निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे

निळ्या तळ्याच्या
काठावर बगळा
बघत वाट बगळीची
उभा राहिला तिष्ठत;
बगळी गेली होती
शॉपिंग्‌ करायला.
चार तासांनी परतल्यावर
'हुश्श' म्हणाली

बगळा आणि मासा

निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे

निळ्या तळ्याच्या
काठावरच्या बगळ्याने
तळ्यातल्या एका माश्याला
गिळंकृत करायला
पाण्यात सूर मारला.
चोचीत पकडल्यावर
बगळा त्याच्या देवाला
'थॅंक्यू' म्हणाला

बगळा आणि मासे

निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे

निळ्या तळ्याच्या
काठावर माझा बंगला.
गळ्यात भोळ्या लोकांच्या
मी माल बांधला;
पैसा करायला,
बंगल्यात छान रहायला.
मी माझ्या देवाला, दैवाला
'थॅंक्यू' म्हणतो

बगळा मुलांची शाळा

निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे

निळ्या तळ्याच्या
काठावर एकदा
जमली मुलांची शाळा
रमली मुले खेळात
“तळ्यात, मळ्यात”.
चित्र हे
अधिक कोण
खुलवू शकेल?

बगळा "आम्हाला वगळा, नि पहा...”

निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे

निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
म्हणाला एकदा माणसाला,
"आम्हाला वगळा,
नि पहा होतेय्‌ का
अपुरे चित्र तुमचे पुरे.”
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

बगळा आणि तपस्वी

निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे

निळ्या नदीच्या
काठावर एकदा
एका तपस्व्यागत
एक बगळा
स्तब्ध उभा होता.
नदीच्या प्रवाहागत
कालप्रवाह संथपणे
चालला होता

बगळा आणि पुन्हा कावळा

निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे

निळ्या तळ्याच्या
काठावर बगळा
होता एकदा बसला;
तिथे आला कावळा,
त्याचा नि आपला रंग पाहून
लज्जाविष्ट झाला.
दुकानात एका जाऊन
साबण विकत आणून
बसला घासत आपलं अंग
राहिला घास-घास-घासण्यात दंग
बगळा गेला होता
केव्हाच उडून!

बगळा आणि नीती

निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे

निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
आठवण करून देई
इसापचा गोष्टीची
कोल्ह्याची नि बगळ्याची.
त्या गोष्टीतली
इसापनीती ऐशी :
"शठंप्रति शाठ्यम्‌".
येशुवीनीती ऐशी :
"मारली कुणी थप्पड,
पुढे करा दुजा गाल
(असला जरी खप्पड)”.
येशू-इसाप ह्यांचा वाद
चालू आहे चिरंतन.

Sunday, June 26, 2011

(१५१) ती येते आणिक जाते................................भाजीवाली

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

ती येते आणिक जाते भाजीवाली

ती येते आणिक जाते
येताना कधि कळ्या आणिते
अन्‌ जाताना फुले मागते
येणे-जाणे, देणे-घेणे
असते गाणे जे न कधी ती म्हणते

येताना कधि अशी लाजते
तर जाताना ती लाजविते:
कळते काही उगीच तेही
नकळत पाही काहीबाही,
अर्थावाचुन असते ’नाही’, ’हो’, ही म्हणते

येतानाची कसली रीत:
गुणगुणते ती संध्यागीत,
जाताना कधि फिरून येत,
जाण्यासाठिच दुरुन येत,
विचित्र येते, विरून जाते जी सलते

कळ्याफुलांच्या मागे येते
कोमट सायंचेहरा घेते
उदी उदासी पानी भरते
"मी येऊ रे ?" ऐकू येते
मध्यरात्रभर तेच तेच प्रतिध्वनि ते

कवी : आरती प्रभू

ती येते आणिक जाते
विकण्यासाठी भाजी आणिते
विकते आणि पैसे घेते
येणे-जाणे, देणे-घेणे
होत असते जे न कधी ती चुकते

येताना कधि पान खाते
अन्‌ हसुनी दातां दाखवते
सौदा करुनी झाल्यावरती
मारते गप्पा काहीबाही,
लक्ष न देता काही वेळी होय-नाही म्हणते

येतानाची तिची अशी रीत:
गुणगुणते ती काही गीत,
जाताना पुन्हा फिरून तैसे;
सौम्य प्रसन्न आनंदाचे
वातावरण ती भरून जाते

अपुल्या बालका घेऊन येते
अधुनिमधुनि तया प्रेमे चुंबते
गप्पा करता तया पान्हा देते
स्तनपान करुनी मूल झोपी जाते
दिवसभर भाजी विकत कालक्रमणा करते

(१५०) धुंदी कळ्यांना..................................संतप्त भावनांना

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

धुंदी कळ्यांना संतप्त भावनांना

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना

तुझ्या जीवनी नीतिची जाग आली
माळरानी या प्रीतिची बाग आली
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा

तुझा शब्द की थेंब हा अमृताचा
तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा
उगा लाजण्याचा किती हा बहाणा

चिरंजीव होई कथा मिलनाची
तृषा वाढते तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे रूप या क्षणांना

कवी : जगदीश खेबुडकर
चित्रपट:  धाकटी बहीण

संतप्त भावनांना, प्रक्षुब्ध भावनांना
शब्दरूप आले तुझ्या भावनांना

ज्वालामुखीसी अचानक जाग आली
की धरणीकंपास सुरवात झाली
पडला माझ्यापुढे हा उखाणा!

तुझे शब्द की थेंब हे जहराचे
तुझे शब्द की उच्छ्वास हे ड्रॅगनाचे
असे खास हा कलियुगाचा जमाना!

ज्येष्ठी चढे ताप विवस्वताचा
तसा वाढे अंगार तुझ्या लोचनांचा
पण झाले तरी काय सांग मला ना!

(१४९) दूर दूर चांदण्यात............................एका ऋ्णकोची कैफियत

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

दूर दूर चांदण्यात एका ऋ्णकोची कैफियत

दूर दूर चांदण्यात
मी असाच हिंडतो
तारकांस हालचाल
मी तुझी विचारतो

वाटते कधी चुकून
भेटशील तू अजून
थांबता पुन्हा मधून
अन्‌ उगीच सावल्यात
स्वैरभैर पाहतो

चाललो असेच गात
ऐकते उदास रात
चंद्रमा झुरे नभात
अन्‌ इथे फुलाफुलात
मी तुलाच शोधतो

वेड लागले जिवास
हे तुझे दिशात भास
हा तुझा मनी सुवास
आपुल्याच आसवात
मी वसंत ढाळतो

कवी : सुरेश भट

तुजपासून दूर दूर
मी राहू इच्छितो
लपूनछपून हालचाली
मी करत राहतो

वाटते भीती सदैव
भेटशील तू चुकून
चालता रस्त्यामधून
मागेपुढे अन्‌ उगीच
स्वैरभैर पाहतो

धुंडतो दैनिकात
नोकरीची जाहिरात
बायको झुरे घरात
अन्‌ कसेतरी दिवस
मी पाठी घालतो

वेड लागले की काय
होई अधुनमधुन भास
हा नियतीचा खेळ खास
आशांकुर तरीही
मनात मी जोपासतो

(१४८) तू तेव्हा तशी........................... तू केव्हा अशी

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

तू तेव्हा तशी तू केव्हा अशी

तू तेव्हा तशी
तू तेव्हा अशी
तू बहरांच्या बाहूंची

तू ऐल राधा,
तू पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची

तू काही पाने
तू काही दाणे
तू अनोळखी फुलांची

तू नवीजुनी
तू कधी कुणी
खारीच्या ग डोळयांची

तू हिरवी कच्ची
तू पोक्त सच्ची
खट्टी मिठ्ठी ओठांची

तू कुणी पक्षी
पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची

कवी: आरती प्रभू
चित्रपट : निवडुंग

तू केव्हा अशी
तू केव्हा तशी
तू लहरी फारची

तू ऐल तीरा
मी पैल तीरा
नदी वाहते मधूनची

तू करशी बहाणे
घालशी उखाणे
तू अजब प्रश्नांची

तू नवीजुनी
काढशी उणी
भासशी घारीच्या डोळयांची

तू लवंगी मिरची
तू फटाकडी
हट्टी मनाची

तरीही मला तू
फसवू शकशी;
करणी ईश्वराची!

(१४७) आला आला वारा (१) ........................पावसाच्या धारांसंगे
******आला आला वारा (२).........................वादळ

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

आला आला वारा पावसाच्या धारांसंगे

आला आला वारा, संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा, सया निघाल्या सासुरा

नव्या नवतीचं बाई, लकाकतं रुप
माखलं गं ऊनं, जनू हळदीचा लेप
ओठी हासू, पापणीत आसवांचा झरा

आजवरी यांना किती जपलं, जपलं
काळजाचं पानी किती शिपलं, शिपलं
चेतवून प्राण यांना, दिला गं उबारा

येगळी माती आता ग येगळी दुनिया
आभाळीची माया काय करील किमया
फु्लंल बाई पावसानं मुलुख ग सारा

कवी : सुधीर मोघे
चित्रपट : हा खेळ सावल्यांचा (१९७६)

पावसाच्या धारांसंगे आला सुसाट वारा
छतरी गेली उलटुनि, उडु लागी सैरावैरा

भक्कम हुती माजी छ्तरी, दिमाखाचं रूप
काळंभोर तिचं कापड, जनू अमुशेची रात
नका हासू, डोळी माज्या आसवांच्या धारा

आजवरी तिला किती जपलं, जपलं
जोखाईचं तीरथ तिच्यावर शिपलं
मोडुन आज पर तिनं केला गं घोटाला

येगळी छतरी आता ग येगळी दुनिया
हाये माजी खातरी करील ती किमया
होअल फिदा तिच्यावर मुलुख ग सारा

आला आला वारा वादळ

आला आला वारा, संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा, सया निघाल्या सासुरा

नव्या नवतीचं बाई, लकाकतं रुप
माखलं गं ऊनं, जनू हळदीचा लेप
ओठी हासू, पापणीत आसवांचा झरा

आजवरी यांना किती जपलं, जपलं
काळजाचं पाणी किती शिपलं, शिपलं
चेतवून प्राण यांना, दिला गं उबारा

येगळी माती आता ग येगळी दुनिया
आभाळीची माया काय करील किमया
फु्लंल बाई पावसानं मुलुख ग सारा

कवी : सुधीर मोघे
चित्रपट : हा खेळ सावल्यांचा (१९७६)

आला सुसाट वारा, संगे पावसाचा मारा
असे असूनही बाया निघाल्या बाजारा

दिसे बिजलीमाईचं लखाखतं रूप
गमला हा जणू वरुणाचा शाप
अंगी आणी शहारा, जीव करा घाबरा

जाण्यापूर्वी त्यांना कितीपरी सांगितलं -
पावसाचं पाणी किती भयंकर होईल
चेतवून प्राण त्यांना, दिला गं इशारा

सगळीकडं झाला चिखल घोट्याइतुका
आभाळीची किमया करी पार विचका
हैराण होई वादळानं मुलुखचि सारा

Tuesday, June 21, 2011

(१४६) उद्या.................................................नोटीस

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

उद्या नोटीस

उद्या उद्या तुझ्यामध्येच
फाकणार न उद्या
तुझ्यामध्येच संपणार
ना कधीतरी निशा

उद्या तुझी धरून कास
आज कार्य आखले
तुझ्यावरी विसंबुनी
कितीक काम टाकले

उद्या तुझ्याचसाठी आज
आजचे न पाहतो
तुझ्याचकडे लावुनी
सदैव दृष्टी राहतो

उद्या तुझ्यासवे निवांत
आजचा अशांत मी
उद्या तुझ्यामुळेच जिवंत
आजचा निराश मी

कवी : अनिल

उद्या तुझ्यामाझ्यामध्येच
फाकणार झगडा फाकडा,
तुझी मिजासी संपणार,
उतरणार तुझी नशा

मनी तुझी धरून शेंडी
आज कार्य आखले,
उर्वरित कालचे
करुन काम टाकले

उद्याच्या तंट्यासाठी आज
घेतली पूर्ण दक्षता,
उद्याकडेच लावुनी
सदैव दृष्टी राखली

उद्या तुझ्यासवे समर
आज पूर्ण शांत मी,
चंडवातपूर्व उदधि
स्मर निसर्गचाल ही!

(१४५) धुआरी.....................हा हा हरवली चिमा प्रियतमा माझी जीवाची सखी

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

धुआरी हा हा हरवली चिमा प्रियतमा
माझी जीवाची सखी

उदासीन मन झाले का ये वेळी
आणिकांचे मेळी
सुख न ये

उसळले ढग
आभाळ भरून
आले अंधारून
जग सारे

कोसळे पाउस
सरीवर सरी
दाटली धुआरी
चोहुकडे

तुझा ये आठव
अश्या अवसरी
मूर्ति चित्तांतरी
उभी राहे

जगात राहून
जगास पारखा
आठवी सारखा
प्रेम तुझे

कवी : अनिल

उदासीन मन झाले का ये वेळी
कुठल्याचि विड्यांच्या मेळी
सुख न ये

उसळले ढग
आभाळ भरून
आले अंधारून
जग सारे

कोसळे पाउस
सरीवर सरी
दाटली धुआरी
चोहुकडे

तुझा ये आठव
अश्या अवसरी
मूर्ति चित्तांतरी
उभी राहे

जगात राहून
तुझ्यास पारखा
आठवी सारखा
प्रिय चिलिमे, तुला!

(१४४) आला वसंत देही.............................भरले दिवस माझे

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

आला वसंत देही भरले दिवस माझे

आला वसंत देही, मज ठावूकेच नाही

भीतीविना कशाचा देहावरी शहारा
हे ऊन भूषविते सोन्यापरी शरीरा
का गुंफिली जरीने आभाळीची निळाई

ओठांत थांबते का हासू उगाच माझे
बाहेर डोकविता का बोल आज लाजे
तो पोर कोकिळेचा रानात गीत गाई

हे आज काय झाले, माझे मला कळेना
या नेणत्या जीवाला हे गूज आकळेना
ये गंध मोगर्‍याचा, आली फुलून जाई

कवी : ग. दि. माडगूळकर
चित्रपट : प्रपंच (१९६१)

भरले दिवस माझे, मज ठावूकेच नव्हते

भीतीपरत्वे आला देहावरी शहारा
गात्रांमधुन माझ्या निथळति घर्मधारा
गुंफिले मज खास जाली धूर्त पोलिसांनी

ओठांत थांबले शब्द, “हे प्रारब्ध माझे”
नसे रम्य खचित दृश्य दिसे मला जे
येई कावळ्याची कटु कावकाव कानी

हे आज काय झाले, माझे मला कळेना
या अजाणत्या जीवाला हे गूढ आकळेना
ये गंध केवड्याचा, घडे सर्पदंश रानी

(१४३) सकाळी उठोनी....................................श्रीमंत पतीची राणी

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

सकाळी उठोनी श्रीमंत पतीची राणी

सकाळी उठोनी । चहा-काँफी घ्यावी,
तशीच गाठावी । विज-गाडी ||

दाती तृण घ्यावे । हुजूर म्हणून;
दुपारी भोजन । हेची सार्थ ||

संध्याकाळ होता | भूक लागे तरी,
पोराबाळांवरी । भुंकू नये ||

निद्रेच्या खोपटी । काळजीची बिळे,
होणार वाटोळे । होईल ते ||

कुण्याच्या पायाचा । काही असो गुण;
आपुली आपण । बिडी प्यावी ||

जिथे निघे धूर । तेथे आहे अग्नी;
आम्ही जमदग्नी । बहुरूपी ||

कवी : बा.सी.मर्ढेकर

सकाळी उठोनी । टीव्ही लावावा,
ब्रेकफास्ट घ्यावा । आरामात ॥

आचार्‍या सांगावा । मेन्यू दिवसाचा;
कार्यक्रम अंघोळीचा । उरकावा ॥

दोनचार मैत्रिणींना । फोन करावा,
शॉपिंगचा ठरावा । बेत दुपारचा ॥

नट्टापट्टा करून । बाहेर पडावे;
चायनीज लंच घ्यावे । मैत्रिणींसमवेत ॥

मग शॉपिंग मॉली । भ्रमंती करावी;
तुडुंब भरावी । शॉपिंग बॅग ॥

घरी परतूनी । कॉफी गोड चाखत
शरीर विसावत । बसावे सोफ्यावर ॥

डिनरचा कार्यक्रम । संपवावा रात्री
भर्ता-पुत्र-पुत्री । ह्यांसमवेत ॥

मग दहा वाजता । वेळ झोपण्याची;
योजना उद्याची । साधारण ऐशीच ॥

जय जय रघुवीर समर्थ ।

(१४२) अताशा.........................................ताडीचा अंमल

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

अताशा ताडीचा अंमल

अताशा असे हे मला काय होते?
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते

कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा

असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
नभातून ज्या रोज जातो बुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा

न अंदाज कुठले, न अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे, न अनुमान काही

कशी ही अवस्था कुणाला कळावे?
कुणाला पुसावे ? कुणी उत्तरावे?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे?

कवी : संदीप खरे

सांगतो, कोणी ऐका मला काय होतेय
अंधुक सगळे जग डोळ्यास दिसतेय
बोलता बोलता स-स-स-स्खलन होतेय
अगम्य विसंगति शब्दात येतेय

वरी पाहता पसारा ढगांचा
दिसू लागतोय दंगा दानवांचा
जोशात हालते हात दिसती त्यांचे
आणि दिसे त्यांचा हैदोस भांडण्याचा

कानी ऐकू येतोय भुतांचा इशारा
"पळ रे झणी", बडव-बडवूनि नगारा
नभातून मग उतरताहेत समोरी
शिवभूतगण सर्व भरुनी खटारा

न संधान कसले, न अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जशी धूळ निघते हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे, न अनुमान काही

अशी ही अवस्था, नव्हे दुरवस्था
कुणी दाखविल का मला थोडी आस्था?
असा तोल जातो तसा तोल जातो
विनवतो तोल जाता “सावर रे, गृहस्था!"

(१४१) तरीसुध्दा........................................शिवाय

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

तरीसुध्दा शिवाय

समूहात बसूनही गाणी
ऐकावीशी वाटली तरी
त्यात काय चूक आहे?

शब्दांचं नादरुप असं
मिळून भोगणं ही
प्रत्येकाची अटळ अशी भूक आहे.

तरीसुध्दा डोळे मिटून
मनोमय तालावर नाचता आलं पाहिजे;
एकटं बसून एकट्याने

कवी : मंगेश पाडगांवकर

समूहात बसून शेजार्‍यापाजार्‍यांबद्दल
चटकदार अफवा
ऐकाव्याश्या-सांगाव्याश्या वाटल्या तर
त्यात काय चूक आहे?

शब्दांचं नादरुप असं
मिळून भोगणं हा
प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे.

शिवाय डोळे मिटून
मनोमय नव्या अफवा
निर्माण करता आल्या पाहिजेत
आरामखुर्चीवर पहुडल्या पहुडल्या

(१४०) दु:ख ना आनंदही .............................पश्न ऐसा न ज्या उत्तर

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

दु:ख ना आनंदही
अन अंत ना आरंभही
पश्न ऐसा न ज्या उत्तर :
“करतो मी का बहाणा?”

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.

मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.

एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.

प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.

याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती.

सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.

कवी : आरती प्रभू

"दु:ख ना आनंदही", ही बात माझी ना सही
म्हणतो वरकरणी जरी कालही अन आजही.

मी तसा मुळीच नाही, ना मुळीच मी तसा
ते नसे खरे बिंब माझे, सत्य सांगतो आरसा.

एकला मी गमुनी येई खिन्नता माझ्या मना
मी नसे स्वामी, अभाव भावांचे ज्याच्या खुणा.

पश्न ऐसा न ज्या उत्तर : “करतो मी का बहाणा?
’दु:ख ना आनंदही, न पायी चप्पल ना वहाणा!’ ”

’याद नाही, ब्याद नाही, गगन माझ्या सोबती,
’न गरज वसनाची धडाला असे त्याच्या भोवती!

’परब्रह्म आणि काया जोडुनी यांचा दुवा
’नाव माझी चाललेली, शिडीमधे भरुनी हवा.’ “

"दु:ख ना आनंदही", ही बात माझी ना सही
म्हणतो वरकरणी जरी कालही अन आजही.

(१३९) अग पाटलाच्या पोरी....................फौजदाराचं गाणं

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

अग पाटलाच्या पोरी फौजदाराचं गाणं

अग पाटलाच्या पोरी जरा जपून जपून
बिगिबिगी कुठं ग जाशि शेतामधून?

तुझ्या गालाचि खुलली लाली ग
जणु डाळिंब फुटतंय गाली
ल‌इ घुटमळतंय्‌ माझ्या मनात
चल जाऊ दूर मळ्यांत
संगं पिर्तीचं गाणं गाउ दोघं मिळून

आलं ऊन ग भवती फुलुनी
कुठं जाशी तु ग फुलराणी?
काटं ग बोचतिल बाई
नाजुक तुझ्या पायी
तुझं चंद्रावाणी मुख जाईल सुकून!

रानी वाऱ्याची ऐकून गाणी
नाचे झऱ्याचं झुळुझुळु पाणी
ल‌इ घुटमळतंय्‌ माझ्या मनात
चल जाऊ दूर मळ्यांत
संगं पिर्तीचं गाणं गाउ दोघं मिळून

कवी : श्रीनिवास खारकर

अरं हरामखोरा जरा लपून लपून
बिगिबिगी कुठं रं जाशि बोळामधून?

तुज्या नशिबाची दोरी तुटली रं
जणु होडकं फुटलंय समिंदरी
ल‌इ घुटमळतंय्‌ माझ्या मनात
चल घालू तुज्या हातात
कड्या, नि मग चालु दोघं मिळून

आलं ऊन रं डोईवरती
कुठं जाशी तु रं अनवाणी?
काटं बोचतिल की रं लई
नाजुक तुझ्या पायी
तुझं चंद्रावाणी मुख जाईल सुकून!

तुज्या वरातीची ऐकून गाणी
नाकझरीचं झुरु लागंल पाणी
ल‌इ घुटमळतंय्‌ माझ्या मनात
चल घालू तुज्या हातात
कड्या, नि मग चालु दोघं मिळून

(१३८) कशाला?....................................कशाला?

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

कशाला? कशाला?

आता कशाला उद्याची बात?
बघ उडुनि चालली रात

भरभरूनि पिऊ, रसरंग नऊ
चल बुडुनि जाऊ रंगात

हा ज्वानीचा बहार - लुटू या
भरवसा न ज्वानीचा
दो दिन ही साथ
हासत करि घात

कवी : अनंत काणेकर

आज कशाला कालची बात?
बघ संपुनि गेली रात

भरभरूनि झोकली गावठी मदिरा
गेलो बुडुनि आपण दर्यात

हा ग्लानीचा समय सोसु या
भरवसा न शुद्धिचा
मदिरेची अपुल्या साथ
करि जी अपुला घात

(१३७) अत्तराचा फाया.............................आणि थंडगार आइस्क्रीम

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

अत्तराचा फाया ...आणि थंडगार आइस्क्रीम

अत्तराचा फाया तुम्ही
मला आणा राया

विरहाचे ऊन बाई,
देह तापवून जाई
धरा तुम्ही माझ्यावरी,
चंदनाची छाया

नाही आग नाही धग,
परी होइ तगमग
विस्तवाशिवाय पेटे,
कापराची काया

सुगंधाने झाले धुंद,
जीव झाला ग बेबंद
देहभान मी विसरावे,
अशी करा माया

कवी : संजीव
चित्रपट : भाऊबीज (१९५५)

थंडगार आइस्क्रीम
मला आणा खाया

वैशाखाचे ऊन बाई,
देह तापवून जाई
धरा तुम्ही माझ्यावरी,
जरा दयामाया!

होते आग भासे धग,
शरीराची तगमग
स्टोव्हसारखी पेटे
माझी कोवळी काया

ग्लानिने मी झाले सुन्न,
श्वास जणु झाला बंद
देहावसान होण्यापूर्वी
आइस्क्रीम आणा खाया!

(१३६) स्वप्नामध्ये..................................आणि गुंगीमध्ये

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

स्वप्नामध्ये आणि गुंगीमध्ये

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!
अर्थ चालला अंबारीतुन
शब्द बिचारे धडपडले!

प्रतिमा आल्या उंटावरुनी;
नजर तयांची पण वेडी;
शब्द बिथरले त्यांना; भ्याले
स्वप्नांची चढण्या माडी!

थरथरली भावना मुक्याने
तिला न त्यांनी सावरले;
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!

कवी : विंदा करंदीकर

गुंगीमध्ये रचता ओळी
व्याकरण मला न आठवले!
अर्थ चालला भिंत धरून
शब्द नि पाय, दोन्ही लटपटले!

प्रतिमा झाल्या उलट्यासुलट्या
नजर माझी भिरभिरली;
शब्द पांगले, अर्था भ्याले
चढली फारच ताडी!

अंधुक होई दृश्य धुक्याने
मला न कोणी सावरले;
भिंतीवर कोळी रचत ओळी
बसलेला नजरेस दिसे!

(१३५) स्वातंत्र्यदेवीची विनवणी..................मंत्रीपदधार्‍याचा शाहिरी 'फटका'

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

स्वातंत्र्यदेवीची विनवणी मंत्रीपदधार्‍याचा शाहिरी 'फटका'

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥

कवी : कुसुमाग्रज

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज अजि न का?
मीच सुनवतो तर्जनी दावुनी वाट वाकडी धरू नका ॥

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय जनांनो मला असे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥

होशियारिच्या गळ्यात माळा अभिमानाने घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥

वेतन खाऊन काम टाळणे हे तर माझे ब्रीद असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे ऐसे मी हो म्हणू न का?

'जनसेवेस्तव माझी कचेरी' ऐसा असे माझा डंका ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचेहि मी घेऊ न का?

प्रचंड पुतळे पथापथावर न बांधलेत माझे अजून का ?
उत्साहे मम पंथ अनुसरा, मम गोडवे गाण्या चुकू नका॥

सत्ता मुबलक हाती असे पण अधिक सत्ता मजसि गमे
करीन मंदिरी सुवर्णलंका अशी प्रतिज्ञा मी घेऊ न का?

पिंगा घाला माझ्या भवती, दीप पेटत का मजपुढे नसे?
'इथे भ्रष्टता, इथे शिष्टता', शंख उगाचच फुंकू नका ॥

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य मी सदा वदे ।
सच्छीलतेचा मी सूर्य उगवता, उगाच मजवर भुंकू नका॥

(१३४) आज हृदय मम विशाल झाले......................कवीची बायको

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

आज हृदय मम विशाल झाले कवीची बायको

आज हृदय मम विशाल झाले
त्यास पाहुनी गगन लाजले

आज माझिया किरणकरांनी
ओंजळीमधे धरली अवनी
अरुणाचे मी गंध लाविले

या विश्वाच्या कणाकणांतुन
भरुन राहिले अवघे जीवन
फुलता फुलता बीज हरपले

कवी : शंकर वैद्य

आज हृदय मम उदास झाले
तव कवन पाहुनी गगन लाजले

आज तुझ्या निश्चयी करांनी
घेउन कागद धरली झरणी
'ट'ला 'ट'चे तू गंध लाविले

या शब्दांच्या कणाकणांतुन
उभे तुझे हे राहिले कवन
ते फुलता फुलता अर्थ हरपले

Monday, June 20, 2011

(१३३) अजून आठवे..............................एक अतिक्लेशदायक अनुभव

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

अजून आठवे एक अतिक्लेशदायक अनुभव

अजून आठवे ती रात पावसाळी
मने धुंद वेडी भिजून चिंब झाली

जरा स्पर्श होता सुटे कंप हाती
नको बंद आता अशा धुंद राती
लाज लाजुनी का आज दूर गेली

मिटून घेतले तू पंख पापण्यांचे
तरी त्यात वेडे स्वप्न मीलनाचे
नको हा दुरावा अशा रम्य वेळी

कवी : मधुसूदन कालेलकर

अजून आठवे ती रात पावसाळी
विधिलिखित होते माझ्या कपाळी

कधी स्मरण होता सुटे कंप हाती
न बंद होता येती भयप्रद स्मृती
झोप उडुनी आजही दूर गेली

मिटून घेतले मी पंख पापण्यांचे
परी आत चाले चलच्चित्रण भुतांचे
न मिळे विसावा अशा दुष्ट वेळी

(१३२) अनुराग.................................आणि राग

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

अनुराग आणि राग

अनुरागाचे थेंब झेलती
प्रीत-लतेची पाने
तुझ्या नि माझ्या भेटीमधुनी
फुलती धुंद तराणे

मंतरला हा कुंज लाजरा
महिवरला सुम-भार हासरा
झिरमिर झिरमिर पाऊसधारा
गाती श्रावण-गाणे

मधुमय हा मृद्‍गंध वाहतो
बहरुनिया वनवृंद नाचतो
तरु वेलींना असे बिलगती
अधि-या प्रीत-सुखाने

कवी : शांताराम नांदगावकर

तव रागाच्या उडता ठिणग्या
रचतो हे गाणे
तुझ्या नि माझ्या तंट्यामधुनी
फुलती तंग तराणे

मंतरला हा मंच खाजरा
महिवरला कोणी तू असुरा?
कुरबुर कुरबुर अविरत चाले
एकच रडगाणे

तुडुंब निर्झर गढुळ वाहतो
बहकून समंधवृंद नाचतो
वेली तरूंना घट्ट बिलगती
भेदरून भयाने

(१३१) अजून नाही.........................................अजून नाही

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.

अजून नाही अजून नाही

अजून नाही जागी राधा,
अजून नाही जागे गोकुळ;
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजुळ.

मावळतीवर चंद्र केशरी;
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन.

विश्वच अवघे ओठा लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव;
डोळ्यामधले थेंब सुखाचे:
"हे माझ्यास्तव... हे माझ्यास्तव..."

कवयित्री : इंदिरा संत

अजून नाही उठला नवरा
केव्हाच उठले सगळे गोकुळ;
अशा अवेळी शेजारघरती
गर्जू लागला श्री. भांदकुदळ.

पूर्वदिशेवर सूर्यकेसरी
ऊन ओके त्याचे रणरण;
अपुल्या किचनमधे उभी ती
निःश्वास टाकत, सुन्न तिचे मन.

विश्वच अवघे अपुल्यात दंग
कॉफी प्याली ती चवहीन;
डोळयांमधुनी थेंब गळाले;
"हे कोणास्तव.... हे कोणास्तव...."