प्रास्ताविक
केशवसुत कवींची "आम्ही कोण" ह्या शीर्षकाची एक प्रसिद्ध कविता १९०२ साली "मनोरंजन" मासिकात छापून आली होती. सगळ्या कविवर्गाचे साभिमान स्तवन केशवसुतांनी त्या कवितेत केले होते. त्यानंतर वीस वर्षांनी प्र. के. अत्रेंनी "केशवकुमार" ह्या टोपणनावाखाली त्याच शीर्षकाची एक कविता प्रसिद्ध केली होती.
प्र. के. अत्रे ह्यांच्या एका विशिष्ट तर्हेच्या काव्यरचना करण्यातल्या कौशल्याबाबत खूप कौतुक बाळगणार्या मी त्या दोन्ही कविता खाली अनुक्रमणिकेच्या तळाशी उद्धृत केल्या आहेत.
===========================================================================
अनुक्रमणिका
कवितांचा क्रम अर्थात "टाइमस्टॅंप्स्"नुसार "मागून पुढे" आहे. म्हणजे उदाहरणार्थ, अनुक्रमणिकेतली #००१ क्रमांकाची कविता ह्या वेब्साइट्च्या अगदी शेवटच्या पानावर आढळेल.
खालच्या अनुक्रमणिकेत कवी/कवयित्रींच्या नावावर किंवा कवितेच्या शीर्षकावर "क्लिक्" केले असता त्या कवितेचे पान लगेच पहाता येईल.
===========================================================================
तुमच्या कंप्युटरवर डावीकडच्या आणि उजवीकडच्या कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आम्ही कोण | आम्ही कोण |
---|---|
आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके- देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया; विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया, दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके; पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया - सौंदर्यातीशया, अशी वसतसे जादू करांमाजि या; फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके! शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे? पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते? ते आम्हीच, सुधा कृतींमधुनीया ज्यांच्या सदा पाझरे; ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते! आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे; आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे! कवी : केशवसुत | ’आम्ही कोण?’ म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी? ’फोटो’ मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला? किंवा ’गुच्छ’ ’तरंग’ ’अंजली’ कसा अद्यापि ना वाचिला? चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी? ते आम्ही- परवाङ्मयातिल करूं चोरून भाषांतरे, ते आम्ही- न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी! डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी! त्याचे वाग्धन वापरून लपवूं ही आमुची लक्तरे! काव्याची भरगच्च घेऊनि सदा काखोटिला पोतडी, दावूं गाउनि आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे, दोस्तांचे घट बैसवून करुं या आम्ही तयांचा ’उदे’! दुष्मानांवर एकजात तुटुनी की लोंबवू चामडीं! आम्हाला वगळा- गतप्रभ झणीं होतील साप्ताहिके! आम्हाला वगळा- खलास सगळी होतील ना मासिके! कवी : प्र. के. अत्रे (केशवकुमार) |